Join us

सायन-पनवेल महामार्गावर बसला अपघात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2020 08:43 IST

Accident News : सायन-पनवेल महामार्गावर तळोजा लिंक रोड जवळ बसने रस्त्याच्या बाजूला असलेल्या भुयारी मार्गाच्या शेडला जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात झाला.

पनवेल : सायन-पनवेल महामार्गावर तळोजा लिंक रोड जवळ बसने रस्त्याच्या बाजूला असलेल्या भुयारी मार्गाच्या शेडला जोरदार धडक दिल्याने मोठ्या प्रमाणात प्रवासी जखमी झाले आहेत.सकाळी 5.30 वाजता हि घटना घडली आहे.घटनेत वाहन चालक गंभीर जखमी झाला आहे.व दहा पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत.यामध्ये गरोदर महिलांचा देखील समावेश आहे.जखमींना एमजीएम रुग्णालय कामोठे येथे दाखल करण्यात आले आहे.अपघात अतिशय भीषण असून वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :अपघातमुंबईनवी मुंबई