सराफाच्या दुकानावरचा दरोड्याचा डाव उधळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 05:59 IST2018-07-09T05:59:49+5:302018-07-09T05:59:57+5:30

गोरेगाव पूर्वेकडील एका सराफाच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला वनराई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

bullion shop news | सराफाच्या दुकानावरचा दरोड्याचा डाव उधळला

सराफाच्या दुकानावरचा दरोड्याचा डाव उधळला

मुंबई : गोरेगाव पूर्वेकडील एका सराफाच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला वनराई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ते रिक्षा आणि दुचाकीवरून शस्त्रसाठा घेऊन दुकानाबाहेर धडकले होते.
गोरेगाव पूर्वेकडील एका बड्या सराफाच्या दुकानाला त्यांनी टार्गेट केले होते. त्यानुसार, ५ जुलै रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मनोज कांतिलाल मेंढे (३२), अक्षय विजय गुप्ता (२६), रतनलाल उर्फ गोलू रमाशंकर गुप्ता (२८) या अटक आरोपींनी रिक्षा आणि दुचाकीवरून दुकान गाठले.
सोबत चॉपरसह दरोड्यासंबंधी साहित्य होते. ते दरोडा टाकणार असल्याची माहिती वनराई पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वनराई पोलिसांनी सापळा रचला आणि दरोडेखोरांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडील वाहनेही जप्त केली आहेत. या प्रकरणी त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे.

Web Title: bullion shop news