बुलेट ट्रेनचे काम वेगात सुरू, ‘टीबीएम’ जर्मनीतून मुंबईत दाखल होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 07:04 IST2025-01-19T07:04:04+5:302025-01-19T07:04:15+5:30

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली कामाची पाहणी

Bullet train work is going on at full speed, 'TBM' will arrive in Mumbai from Germany | बुलेट ट्रेनचे काम वेगात सुरू, ‘टीबीएम’ जर्मनीतून मुंबईत दाखल होणार

बुलेट ट्रेनचे काम वेगात सुरू, ‘टीबीएम’ जर्मनीतून मुंबईत दाखल होणार

मुंबई : बुलेट ट्रेनचे काम वेगात सुरू असून येत्या तीन महिन्यांत टनेल बोअरिंग मशीन (टीबीएम) जर्मनीतून मुंबईत दाखल होणार आहे. त्यामुळे बोगद्याच्या कामाला वेग येणार आहे. दोन्ही बाजूकडून बुलेट ट्रेन एकाच वेळी बाेगद्यातून २५० किमी प्रतितास एवढ्या वेगात धावू शकणार आहेत.  

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली, बुलेट ट्रेन प्रकल्पाचा २१ किमी मार्ग बोगद्यातून जाणार आहे. त्यातील सात किमीचा पट्टा खाडीखालून आहे. २१ पैकी १६ किमी बोगद्याचे काम टीबीएमने तर पाच किमी बोगद्याचे काम न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथडने केले जाणार आहे.

महापेमध्ये कास्टिंग यार्ड 
बोगद्याच्या अस्तरीकरणासाठी महापेमध्ये सेगमेंट कास्टिंग यार्ड सुरू करण्यात आले आहे.
संपूर्ण बोगद्यात लागणारे ७७,००० सेगमेंट्स इथेच तयार करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कास्टिंग यार्डमध्ये ऑपरेशन्स स्वयंचलित आणि यांत्रिकीकरण करण्यासाठी विविध क्रेन, गॅन्ट्री आणि मशीन्स वापरण्यात आल्या आहेत असेही अधिकारी म्हणाले. 

महाराष्ट्रात बुलेट ट्रेनच्या बोगद्याच्या आत एकाच वेळी पास होणाऱ्या दोन्ही दिशेच्या ट्रेनचा वेग ताशी २५० किलोमीटर राखणे शक्य होणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर लोकांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. 
- अश्विनी वैष्णव, रेल्वेमंत्री

Web Title: Bullet train work is going on at full speed, 'TBM' will arrive in Mumbai from Germany

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.