मुंबई - एकीकडे नेस्को ड्रग्ज पार्टी प्रकरणाने खळबळ उडाली असतानाच, विक्रोळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात ड्रग्ज तस्कर मोहम्मद तसवर यासीन कुरेशी उर्फ तसू ( ४८) याच्यावर पोलिसांनी कडक कारवाई करीत तब्बल १८ महिन्यांसाठी हद्दपार केले आहे. त्याचबरोबर पोलिसांनी म्हाडाच्या मदतीने त्याच्या दहा हजार स्क्वेअर फुटांच्या बेकायदेशीर मालमत्तांवरही बुलडोझर फिरविला आहे.
महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ५६ (१) (अ) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, त्याला मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून बाहेर काढण्यात आले आहे. तसू कुरेशीवर यापूर्वीच गंभीर स्वरूपाचे एकूण ८ गुन्हे दाखल आहेत. यामध्ये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये २ गुन्हे, बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण करण्याचे ३ गुन्हे, अमली पदार्थ विक्रीचे २ गुन्हे तसेच महिलांना छेडछाड केल्याचा १ गुन्हा समाविष्ट आहे. या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे तो पोलिसांच्या रडारवर होता.
गेल्या तीन ते चार वर्षांत या मालमत्ता उभ्या राहिल्या होत्या. एवढे मोठे बांधकाम राजरोसपणे उभे राहत असताना संबंधित यंत्रणांनी दुर्लक्ष कसे केले? या बांधकामावर गेल्या काही वर्षांत कारवाई का झाली नाही? याचीही चौकशी करण्याची मागणी होत आहे.
अनधिकृत घर, फिटनेस सेंटर पाडलेपोलिसांनी तसूचे टागोरनगर, विक्रोळी (पूर्व) येथील गाळा क्रमांक ३८१५, चाळ क्रमांक ३०५ येथे सुमारे पाच हजार स्क्वेअर फूट क्षेत्रफळावर उभारलेले अनधिकृत घर म्हाडाच्या मदतीने पूर्णपणे पाडून टाकले. या अनधिकृत मालमत्ता इतरांच्या नावाने खरेदी करण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे, गाळा क्रमांक २५४२, चाळ क्रमांक १५० येथे असलेले त्याचे फिटनेस सेंटरही या कारवाईत जमीनदोस्त करण्यात आले. हे बांधकामही सुमारे पाच हजार स्क्वेअर फूट क्षेत्रात अनधिकृतपणे करण्यात आले होते. ही संपूर्ण धडक कारवाई अपर पोलिस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) महेश पाटील आणि पोलिस उपआयुक्त (परिमंडळ-७) हेमराज सिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रोळी पोलिस आणि म्हाडा अधिकाऱ्यांच्या पथकाने पार पाडली.
Web Summary : Notorious drug trafficker Tasu Qureshi was exiled for 18 months. Police and MHADA demolished his ten thousand square feet illegal properties in Vikhroli, Mumbai. Action was taken under the Maharashtra Police Act.
Web Summary : कुख्यात ड्रग तस्कर तासु कुरेशी को 18 महीने के लिए निर्वासित किया गया। पुलिस और म्हाडा ने मुंबई के विक्रोली में उसकी दस हजार वर्ग फुट अवैध संपत्तियाँ ध्वस्त कर दीं। महाराष्ट्र पुलिस अधिनियम के तहत कार्रवाई की गई।