बिल्डरकडून गिरणी कामगारांची दिशाभूल, गुन्हा दाखल होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 10:05 IST2026-03-24T10:05:27+5:302026-03-24T10:05:27+5:30

प्रसाद लाड यांनी तारांकित प्रश्नाद्वारे हा प्रश्न उपस्थित केला होता.

builder misleads mill workers, case to be registered | बिल्डरकडून गिरणी कामगारांची दिशाभूल, गुन्हा दाखल होणार

बिल्डरकडून गिरणी कामगारांची दिशाभूल, गुन्हा दाखल होणार

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : म्हाडाचे नाव आणि लोगोचा गैरवापर करून गिरणी कामगारांची दिशाभूल करणाऱ्या विकासक चढ्ढा डेव्हलपर्स अँड प्रमोटर्सविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश म्हाडा उपाध्यक्षांना देण्यात येतील, असे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सोमवारी विधान परिषदेत सांगितले.

प्रसाद लाड यांनी तारांकित प्रश्नाद्वारे हा प्रश्न उपस्थित केला होता. शेलू आणि वांगणी येथे ८१ हजार घरे खासगी बिल्डरच्या माध्यमातून बांंधण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला. मात्र, विकासक परस्पर गिरणी कामगारांशी संपर्क साधून दिशाभूल करून पैसे उकळत आहे. बळजबरीने संमतीपत्र भरून घेत असून विकासकावर कारवाई करावी, अशी मागणी आ. लाड यांनी केली.

मंत्री देसाई उत्तर देताना म्हणाले, प्रकल्पाच्या जाहिरातीसाठी दहा अटी व शर्तींच्या अधीन राहून विकासकाला म्हाडाचे नाव व लोगो वापरण्याची परवानगी दिली होती. मात्र, इतर प्रकल्पासाठी त्याने म्हाडाचे नाव व लोगो वापरून गैरवापर केल्याचे निदर्शनास आले आहे. 
 

Web Title : बिल्डर द्वारा मिल मजदूरों को गुमराह करना; एफआईआर दर्ज होगी

Web Summary : चड्ढा डेवलपर्स नामक एक बिल्डर ने मिल मजदूरों को गुमराह करने के लिए म्हाडा के नाम का दुरुपयोग किया। मंत्री शंभूराज देसाई ने घोषणा की कि डेवलपर के खिलाफ पैसे निकालने और जबरन सहमति लेने के लिए एफआईआर दर्ज की जाएगी। डेवलपर को केवल विशिष्ट परियोजना विज्ञापनों के लिए म्हाडा के नाम का उपयोग करने की अनुमति थी, दूसरों के लिए नहीं।

Web Title : Builder Misleads Mill Workers; FIR to be Filed

Web Summary : A builder, Chadha Developers, misused MHADA's name to mislead mill workers. Minister Shambhuraj Desai announced an FIR will be filed against the developer for extorting money and coercing consent. The developer was only permitted to use MHADA's name for specific project advertisements, not others.