Join us

Budget 2022: अर्थसंकल्प नव्हे, निवडणूक संकल्प!, जयंत पाटील यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 13:04 IST

Budget 2022, Jayant Patil: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वर्ष २०२१-२२ साठीचा अर्थसंकल्प सादर केला.

Budget 2022, Jayant Patil: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वर्ष २०२१-२२ साठीचा अर्थसंकल्प सादर केला. सीतारामन यांनी अर्थसंकल्पातून विविध घोषणा केल्या. पण सर्वसामान्य करदात्यांना यंदाही कोणताही दिलासा अर्थ संकल्पात देण्यात आलेला नाही. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. 

''अर्थसंकल्प नव्हे, निवडणूक संकल्प'', असं ट्विट करत जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. या महिन्यात देशात उत्तर प्रदेश, पंजाबसह एकूण पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारनं अर्थसंकल्प सादर केला असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :अर्थसंकल्प 2022जयंत पाटील