अजिंठा, वेरुळमध्ये दहा देशांची बौद्ध संस्कृती; पर्यटन मंत्र्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 06:40 IST2023-04-25T06:39:30+5:302023-04-25T06:40:09+5:30

बोधगया येथे विविध देशांनी स्तूप आणि गौतम बुद्ध यांच्या अप्रतिम मूर्ती साकारल्या आहेत.

Buddhist culture of ten countries in Ajanta, Verul; Information from Minister of Tourism | अजिंठा, वेरुळमध्ये दहा देशांची बौद्ध संस्कृती; पर्यटन मंत्र्यांची माहिती

अजिंठा, वेरुळमध्ये दहा देशांची बौद्ध संस्कृती; पर्यटन मंत्र्यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या भगवान गौतम बुद्धांच्या आचारविचारांचे विविध देशांमधील प्रतिबिंब अजिंठा-वेरुळ लेण्यांच्या परिसरात बघता येणार आहे. १० बाैद्ध देशांना त्यासाठी येथे प्रत्येकी पाच एकर जागा राज्य सरकार नाममात्र दराने देणार आहे. पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सोमवारी पत्रकारांशी अनाैपचारिक चर्चा करताना ही माहिती येथे दिली. 

बोधगया येथे विविध देशांनी स्तूप आणि गौतम बुद्ध यांच्या अप्रतिम मूर्ती साकारल्या आहेत. त्याच धर्तीवर अजिंठा-वेरुळमध्ये जगभरातील बौद्ध संस्कृतीचे दर्शन बुद्ध थीम पार्कमध्ये  घडू शकेल. येत्या सहा महिन्यांत या प्रकल्पाची उभारणी सुरू करण्याचा प्रयत्न असेल, असे लोढा यांनी सांगितले. 

कार्लाजवळ चाणक्य संग्रहालय
nलोणावळाजवळ असलेल्या कार्ला लेणी परिसरात एमटीडीसीच्या जागेवर चाणक्य थीम पार्क उभारले जाईल. आर्य चाणक्यांच्या पाच सिद्धांतांवर आधारित हा पार्क असेल.
nराज्यात ५०० ठिकाणी उद्योजकता प्रशिक्षण केंद्रांची उभारणी केली जाईल. शिवराज्याभिषेक दिनी ६ जूनला एकाचवेळी या केंद्रांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचा प्रयत्न असेल.

मुंबई महोत्सव नोव्हेंबरमध्ये
मुंबईच्या विविध संस्कृतींचे दर्शन घडविणाऱ्या मुंबई महोत्सवाचे आयोजन नोव्हेंबरमध्ये पर्यटन विभाग करणार आहे. जून-जुलैमध्ये कोकणात कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

 

Web Title: Buddhist culture of ten countries in Ajanta, Verul; Information from Minister of Tourism