भाऊबीज अंगणवाडी सेविकांसोबत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2020 17:57 IST2020-11-17T17:56:41+5:302020-11-17T17:57:09+5:30
Anganwadi workers : दीपावलीच्या शुभेच्छा

भाऊबीज अंगणवाडी सेविकांसोबत
मुंबई: बोरिवली पश्चिमेकडील 50 हजार लोकसंख्या असलेल्या गणपत पाटील नगर या वस्तीत कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होण्याची भीती वर्तविली जात होती. कोरोनाच्या संकटकाळात नागरिकांची अंगणवाडी सेविकांनी घरोघरी जाऊन तपासणी केली.
प्रभाग क्रमांक 1 च्या स्थानिक शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी पालिका अधिकाऱ्यांसमवेत या ठिकाणी दररोज आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करत कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम यशस्वी करण्यासाठी विभागातील अंगणवाडी सेविकांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.शिवसेनेचे माजी नगरसेवक, मुंबै बँक संचालक अभिषेक घोसाळकर यांना आरती ओवाळत अंगणवाडी सेविकांनी भाऊबीज साजरी केली.यावेळी त्यांनी अंगणवाडी सेविकांना भेटवस्तू देत दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.कोरोनाच्या संकटकाळात अंगणवाडी सेविकांनी केलेले कार्य बहुमूल्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी शाखाप्रमुख राजू इंदुलकर, महिला शाखासंघटक ज्यूडी मेंडोसा, युवा सेनेचे जितेन परमार, लालचंद पाल उपस्थित होते.