Join us
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटनचे पंतप्रधान स्टार्मर यांचे मुंबईत आगमन; मोदींशी आज बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 10:08 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान स्टार्मर यांची गुरुवारी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क  मुंबई : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर बुधवारी मुंबई दौऱ्यावर आले. त्यांच्या स्वागतासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्र-गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल आदींनी पुष्पगुच्छ देऊन स्टार्मर यांचे स्वागत केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान स्टार्मर यांची गुरुवारी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. भारत–ब्रिटनमधील  भागीदारी अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने ही भेट ऐतिहासिक मानली जात आहे. दोन्ही नेते ‘सीईओ फोरम’ तसेच ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट’मध्ये सहभागी होणार आहेत.

मोदी-स्टार्मर यांची बैठकदोन्ही राष्ट्रप्रमुखांच्या बैठकीत ‘व्हिजन २०३५’ रोडमॅपनुसार व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, संरक्षण, हवामान बदल, ऊर्जा आणि परस्पर संबंध अशा विविध क्षेत्रांतील प्रगतीचा आढावा घेण्यात येईल. भारत–ब्रिटन सर्वंकष आर्थिक आणि व्यापार कराराच्या माध्यमातून दोन्ही देशांतील आर्थिक सहकार्याच्या नव्या संधींवरही चर्चा होणार आहे. मोदी आणि स्टार्मर गुरुवारी सकाळी ११:३० वाजता माध्यमांसमोर निवेदन करतील.

ब्रिटनचे पंतप्रधान यशराज स्टुडिओतबुधवारी युनायटेड किंगडमचे पंतप्रधान कीअर स्टार्मर यांनी भारताच्या दौऱ्यादरम्यान अंधेरीतील यशराज फिल्म्स स्टुडिओला भेट दिली. स्टार्मर यांनी अभिनेत्री राणी मुखर्जी आणि यशराज फिल्म्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय विधानी यांच्याशी संवाद साधला. पुढील वर्षी  ब्रिटनमध्ये यशराजच्या तीन चित्रपटांचे चित्रीकरण होणार असल्याची घोषणा केली. ब्रिटनचे पंतप्रधान बुधवारी सकाळी लंडनहून मुंबईला आले आणि पोलिसांच्या कडेकोट सुरक्षेत यशराज फिल्म्स स्टुडिओत पोहोचले. या भेटीचा उद्देश ब्रिटन आणि भारतातील सांस्कृतिक संबंध दृढ करणे व दोन्ही देशांच्या चित्रपटसृष्टींमध्ये सहकार्य, देवाणघेवाण वाढवणे असल्याचे ब्रिटिश उच्चायुक्तालयाने म्हटले आहे. स्टार्मर म्हणाले, पुढील वर्षापासून यशराज तीन प्रमुख चित्रपट युनायटेड किंगडममध्ये चित्रित करणार आहे. या निर्णयामुळे 

 

English
हिंदी सारांश
Web Title : UK PM Starmer Arrives in Mumbai, Meeting with Modi Today

Web Summary : UK Prime Minister Keir Starmer arrived in Mumbai for a meeting with Narendra Modi to strengthen India-UK ties. Discussions will cover trade, technology, and climate change. Starmer also visited Yash Raj Studios, announcing three films to be shot in the UK.
टॅग्स :लंडननरेंद्र मोदी