Join us
Daily Top 2Weekly Top 5

"50 हजार घेऊन ये आणि तुझं काम...", झिरवळांच्या कार्यालयात लिपिकाने लाच मागितल्याचा व्हिडीओ बघा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 10:44 IST

Narhari Zirwal: कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील लिपिकाला मंत्रालयातच लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. लाच मागतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात लिपीक पैशांची मागणी करताना ऐकायला येत आहे. 

राज्याचे कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयात, लिपिकाने ३५ हजार रुपयांची लाच घेतली. मंत्रालयातील कार्यालयातच ही घटना घडल्याने खळबळ उडाली. हे प्रकरण अजूनही चर्चेत असून, एका नव्या व्हिडीओने याला हवा मिळाली आहे. या व्हिडीओमध्ये रंगेहाथ पकडण्यात आलेला लिपिक पैशांची मागणी करताना दिसत आहे. ५० हजार रुपये घेऊन ये, असे सांगताना ऐकायला येत आहे. 

अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली. १२ फेब्रुवारी रोजी ही कारवाई करण्यात आली होती. झिरवळ यांच्या कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरंगे याला ३५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. 

मंत्रालयात लाच मागतानाचा व्हिडीओ

राजेंद्र ढेरंगे यांनी एका व्यक्तीला ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. ते या व्हिडीओमध्ये ऐकायला येत आहे. विशेष म्हणजे आणखी एक अधिकारीही या व्हिडीओमध्ये दिसत आहे. ते व्यक्तीला एका केबिनमध्ये घेऊन गेले होते. 

लाच प्रकरणामुळे झिरवळ अडचणीत 

आपल्याच कार्यालयात घडलेल्या लाच प्रकरणामुळे मंत्री नरहरी झिरवळ हे अडचणीत आलेले आहेत. त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी झाली आहे. मात्र, याचे संबंध माझ्यापर्यंत आले, तर राजीनामा देईल. राजीनाम्याबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना असल्याचेही ते म्हणालेले आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Clerk caught demanding bribe in Minister Zirwal's office: Watch video.

Web Summary : A clerk in Minister Narhari Zirwal's office was caught red-handed accepting a bribe of ₹35,000. A video shows him demanding ₹50,000. The incident has put Minister Zirwal in a difficult position, with calls for his resignation.
टॅग्स :नरहरी झिरवाळमंत्रालयलाच प्रकरणभ्रष्टाचारव्हायरल व्हिडिओ