Join us
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर वरिष्ठ निरीक्षक, उपनिरीक्षकाला अटक; कुरारमधील प्रकार; गुन्हे मागे घेण्यासाठी तीन लाखांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 06:13 IST

दोन लाख रुपये तक्रारदाराने पूर्वीच दिले होते. उर्वरित एक लाख रुपयाची मागणी पुन्हा केल्याने तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत  ३ फेब्रुवारीला ‘एसीबी’कडे तक्रार दिली.

मुंबई : आर्थिक फसवणूक आणि लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी ३ लाखांची लाच मागितल्याप्रकरणी कुरार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजीव तावडे व पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर जुन्ने यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) यांना अटक करण्यात आली आहे.

‘एसीबी’ने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराविरुद्ध कुरार पोलिसांत आर्थिक फसवणुकीची तक्रार होती. तसेच दि. २२ जानेवारीला तक्रारदाराच्या भावानेही लैंगिक शोषणाबाबत त्याच्याविरुद्ध तोंडी तक्रारही केली. या दोन्ही प्रकरणांत कारवाई न करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रारदाराकडे तीन लाख रुपयांची मागितल्याचा आरोप आहे. त्यापैकी दोन लाख रुपये तक्रारदाराने पूर्वीच दिले होते. उर्वरित एक लाख रुपयाची मागणी पुन्हा केल्याने तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत  ३ फेब्रुवारीला ‘एसीबी’कडे तक्रार दिली.

कार्यालयातून सहा लाखांची रोकड जप्त

कारवाईनंतर तावडे यांच्या कार्यालयातून सहा लाख ३४ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या अन्य मालमत्तांचाही लेखाजोखा तपासण्यात येत आहे.

लाचखोरीत पोलिसांचीही आघाडी

गेल्या वर्षी एसीबीने केलेल्या कारवाईत महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची १६८ प्रकरणांवर कारवाई केली. त्यापाठोपाठ पोलिस दलातील १२० प्रकरणात कारवाई केली. त्यात ९१.२८ लाख रुपयांची लाच स्वीकारताना अधिकारी, अंमलदार जाळ्यात अडकले आहे.

एक लाख घेताना रंगेहाथ पकडले

दि. १८ फेब्रुवारीला पडताळणी वेळी दोन्ही अधिकाऱ्यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार तात्काळ सापळा रचून जुन्ने यांना एक लाख रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

याप्रकरणी दोन्ही अधिकाऱ्यांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास सुरू असून, या अधिकाऱ्यांवर निलंबनासह विभागीय कारवाई होण्याची शक्यता आहे. पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी ही कारवाई केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai: Corrupt Police Inspectors Arrested for Bribery in Kurar

Web Summary : Two Mumbai police officers were arrested for demanding a three-lakh bribe to drop charges. Officers demanded money to halt action in a fraud and exploitation case. Six lakhs were seized from the office.
टॅग्स :पोलिसलाच प्रकरण