आयकर विभागाच्या लाचखोर अधिकाऱ्याला अटक
By मनोज गडनीस | Updated: May 3, 2024 20:33 IST2024-05-03T20:33:13+5:302024-05-03T20:33:52+5:30
चार लाखांची मागितली लाच, सीबीआयची कारवाई

आयकर विभागाच्या लाचखोर अधिकाऱ्याला अटक
मनोज गडनीस, मुंबई - एका मालमत्तेच्या व्यवहारासाठी टीडीएस (टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स) प्रमाणपत्र जारी करण्यासाठी चार लाख रुपयांची लाच मागणाऱ्या मुंबईमधील आयकर विभागाच्या अधिकाऱ्याला सीबीआयने अटक केली आहे. विकास बन्सल असे या अधिकाऱ्याचे नाव असून तो मुंबईतील एअर इंडिया इमारतीमधील आयकर विभागाच्या कार्यालयात कार्यरत होता.
अटकेनंतर त्याच्या घरी सीबीआयने छापेमारी केली असता त्याच्या घरी १५ लाख रुपयांची रोख रक्कम, सोन्याचे दागिने तसेच काही मालमत्तांची कागदपत्रे आढळून आली. ती जप्त करण्यात आली असून अधिकारी त्याची पडताळणी करत आहेत.