Breezer - Vivid shuffle Festival in Mumbai | ब्रिझर - व्हिव्हिड शफल फेस्टिव्हल रंगणार
ब्रिझर - व्हिव्हिड शफल फेस्टिव्हल रंगणार

मुंबई : व्हिव्हिड शफल या फेस्टिव्हलमध्ये जगभरातील उत्कृष्ट नर्तक आणि नृत्यांगनांना संधी दिली जाते. जगभरातील सर्वोत्तम क्रू, ब्रेकर आणि पॉपर्सचे वैशिष्ट्य असणाऱ्या प्रत्येक प्रादेशिक फेरीचे विजेते लवकरच अंतिम फेरीत लढत देणार आहेत. या फेस्टिव्हलची प्रादेशिक फेरी बँकॉक येथे रंगली. ‘लोकमत’ या फेस्टिव्हलसाठी मीडिया पार्टनर असून वाचकांना या कार्यक्रमामध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री मिळणार आहे.
सात प्रादेशिक फेऱ्यांनंतर या फेस्टिव्हलची अंतिम फेरी २१ सप्टेंबर रोजी फेमस स्टुडिओ, महालक्ष्मी येथे होईल. गेल्या वर्षीच्या ‘ब्वॉय तोरान्डो’ आणि ‘पॉपकॉर्न किंग’ या सुपर प्रतिभावान विजेत्यांसह यंदा जोरदार स्पर्धा होणार आहे. या वर्षी जगभरातून (फिलिपिन्स आॅल स्टार्ससह) त्यांच्या नोंदी पाठवून आठ नृत्यकर्मी सादर करत आहेत. दोन गटांमधील ३२ अंतिम फेरीतील स्पर्धक (ब्रेकिंग आणि पॉपिंग) चॅम्पियन म्हणून नावारूपाला येईल.
अंतिम फेरीचे परीक्षण हॉक (एम्मी-पुरस्कार विजेता नृत्यदिग्दर्शक), किड डेव्हिड (ब्रेकिंग जज आणि स्टेप अप 3 मध्ये समाविष्ट असलेले) आणि राशद (अटलांटा येथील परीक्षक) यांच्यासह स्वदेशी आणि म्युझिक परफॉर्मन्स या पॅनेलद्वारे होईल. युंगराज व किंग्ज युनायटेडचा नृत्याविष्कारही सादर होणार आहे. महोत्सवाचे हे तिसरे वर्ष असून हिप-हॉप संस्कृतीत (स्ट्रीट ग्राफिटी व बीट बॉक्सिंगपासून ते रॅप आणि ब्रेक ब्रेकिंगपर्यंत) सर्वात मोठा फेस्टिव्हल आहे.


Web Title: Breezer - Vivid shuffle Festival in Mumbai
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.