Breaking : मुंबईत झी ग्रुपच्या कार्यालयांवर आयकर विभागाची छापेमारी
By पूनम अपराज | Updated: January 4, 2021 14:09 IST2021-01-04T14:09:03+5:302021-01-04T14:09:52+5:30
Income tax raid : आज सकाळी ११ वाजल्यापासून छापेमारी सुरु केली आहे.

Breaking : मुंबईत झी ग्रुपच्या कार्यालयांवर आयकर विभागाची छापेमारी
मुंबईत आयकर विभागाने झी समूहाच्या कार्यालयांवर आज सकाळी ११ वाजल्यापासून छापेमारी सुरु केली आहे. अधिकारी व कर्मचार्यांच्या चौकशीसह फायलींची छाननी केली जात आहे. परंतु, आता सुरु असलेल्या छापाच्या कारवाईसंदर्भात अद्याप माहिती समोर आली नाही.
आयकर विभागाच्या ६ अधिकाऱ्यांची टीम झी समूहाच्या लोअर परळ येथील कार्यालयावर छापेमारी करत आहे. तर दुसरी आयकर अधिकाऱ्यांची टीमने वरळी परिसरातील हेड ऑफिसवर छापा टाकला आहे. याबाबत सविस्तर माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. या छाप्यांबाबत दिल्लीतून थोड्याच वेळात माहिती मिळण्याची शक्यता आहे. आयकर कर चुकवेगिरी केल्याच्या आरोपाखाली झी समूहाच्या १५ ठिकाणी आयकर विभागाकडून सर्च ऑपरेशन करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.