ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 22:14 IST2025-11-16T22:12:55+5:302025-11-16T22:14:37+5:30

PNG, CNG Line Fault: दुर्घटनेचा सर्वात तीव्र परिणाम सीएनजी गॅसवर चालणाऱ्या वाहनांवर झाला आहे. अनेक सीएनजी स्टेशन्सचा पुरवठा थांबल्यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील टॅक्सी, ऑटो आणि बस सेवांवर मोठा परिणाम झाला आहे.

Breaking! Gas supply disrupted in Mumbai, Thane and Navi Mumbai; Major damage to pipeline, domestic gas png shut down, shortage at CNG stations | ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा

ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा

मुंबई महानगर प्रदेशात आज एक मोठी आणि गंभीर समस्या निर्माण झाली आहे. चेंबूर येथील राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स संकुलाजवळ गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडची मुख्य पाईपलाईन खराब झाल्यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या तिन्ही प्रमुख शहरांचा गॅस पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे.

या दुर्घटनेचा सर्वात तीव्र परिणाम सीएनजी गॅसवर चालणाऱ्या वाहनांवर झाला आहे. अनेक सीएनजी स्टेशन्सचा पुरवठा थांबल्यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील टॅक्सी, ऑटो आणि बस सेवांवर मोठा परिणाम झाला आहे. सीएनजी मिळवण्यासाठी स्टेशन्सवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत, ज्यामुळे सार्वजनिक वाहतूक विस्कळीत झाली आहे.

पीएनजी ग्राहकांनाही फटका

या पाईपलाईनच्या नुकसानीमुळे केवळ सीएनजीच नव्हे, तर हजारो घरगुती ग्राहकांना स्वयंपाकासाठी वापरला जाणारा पीएनजी पुरवठाही बाधित झाला आहे.

दुरुस्तीचे काम सुरू
GAIL आणि महानगर गॅस लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची तात्काळ दखल घेतली आहे. RCF परिसरातील या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात आले असून, पुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या मोठ्या भौगोलिक क्षेत्रातील गॅस पुरवठा एकाच वेळी खंडित झाल्यामुळे, नागरिकांचे जनजीवन आणि शहरातील वाहतूक व्यवस्था गंभीररित्या विस्कळीत झाली आहे. पुरवठा लवकर सुरू व्हावा, यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

Web Title : मुंबई, ठाणे, नवी मुंबई में गैस आपूर्ति बाधित; पाइपलाइन क्षतिग्रस्त

Web Summary : चेम्बूर के पास एक पाइपलाइन टूटने से मुंबई, ठाणे और नवी मुंबई में गैस आपूर्ति बाधित हो गई है। सीएनजी स्टेशनों पर कमी, परिवहन प्रभावित। घरों में पीएनजी आपूर्ति भी प्रभावित। सेवाओं को बहाल करने के लिए मरम्मत जारी है।

Web Title : Gas Supply Disrupted in Mumbai, Thane, Navi Mumbai; Pipeline Damage

Web Summary : A major pipeline rupture near Chembur halts gas supply to Mumbai, Thane, and Navi Mumbai. CNG stations face shortages, impacting transport. PNG supply to homes is also affected. Repairs are underway to restore services quickly.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.