Breaking: Big B Amitabh Bachchan admitted to Nanavati Hospital tested corona positive | Breaking : अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण, रुग्णालयात दाखल

Breaking : अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण, रुग्णालयात दाखल

मुंबई - अमिताभ बच्चन ह्यांना मुंबईतील नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. अमिताभ यांना नेमकं कशामुळे दाखल करण्यात आलंय, यासंदर्भात अधिकृत माहिती मिळालेली नव्हती. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या काळात अचानक ते रुग्णालयात दाखल झाले. त्यामुळे, विविध चर्चा होत असतानाच अमिताभ यांनी स्वत:च कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती दिली. 

मी स्वत:ला रुग्णालयात दाखल केलं असून माझा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यानंतर, माझे कुटुंबीय आणि संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आलं असून त्यांचाही स्वॅब घेण्यात आला आहे. मात्र, त्यांच्या स्वॅबचा अहवाल अद्याप आला नसल्याचे अमिताभ यांनी सांगितले. 

देशात आणि राज्यात कोरोनाचं संकट असून रुग्णालयात कोरोना रुग्णांची मोठी संख्या असल्याचे दिसून येते. त्यातच, अचानक अमिताभ यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या. मात्र, अमिताभ यांनी स्वत:च कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती ट्विटरवरुन दिली आहे. 

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Breaking: Big B Amitabh Bachchan admitted to Nanavati Hospital tested corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.