Breaking : अरबाज खान, सोहेल खान अन् त्याचा मुलगा निर्वान यांच्याविरूद्ध पालिकेने नोंदवला गुन्हा

By पूनम अपराज | Published: January 4, 2021 09:27 PM2021-01-04T21:27:30+5:302021-01-04T21:29:12+5:30

Crime Case :सोहेल खान, त्याचा मुलगा निर्वान खान आणि भाऊ अरबाज खान हे सर्व २५ डिसेंबर रोजी युएईहून मुंबईला आले होते.

Breaking: Arbaaz Khan, Sohail Khan, his son Nirvan registered a crime against the municipality | Breaking : अरबाज खान, सोहेल खान अन् त्याचा मुलगा निर्वान यांच्याविरूद्ध पालिकेने नोंदवला गुन्हा

Breaking : अरबाज खान, सोहेल खान अन् त्याचा मुलगा निर्वान यांच्याविरूद्ध पालिकेने नोंदवला गुन्हा

Next
ठळक मुद्देवास्तविक आंतरराष्ट्रीय विमानतळावर महापालिकेच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  साथ रोग प्रतिबंधक कायदा १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व भारतीय दंड संहिता १८६० अनुसार गुन्हा नोंद केला आहे.

मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेने सुपरस्टार सलमान खानचा भाऊ आणि अभिनेता सोहेल खान, अरबाज खान, निर्वाण खान यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. वास्तविक आंतरराष्ट्रीय विमानतळावर महापालिकेच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

सोहेल खान, त्याचा मुलगा निर्वाण खान आणि भाऊ अरबाज खान हे सर्व २५ डिसेंबर रोजी युएईहून मुंबईला आले होते. हॉटेल ताज लँड्स एन्ड बुक असल्याचे सांगितले गेल्यानंतर हे तिघेही विमानतळाबाहेर आले. पण हॉटेलमध्ये विलग राहण्याऐवजी (क्वारंटाईन) ते थेट घरी गेले. त्यामुळे पालिकेच्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली केल्याप्रकरणी या तिघांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत माहिती पालिकेच्या एच पश्चिम विभागाला कळताच त्यांनी खान बंधू यांच्याविरोधात साथ रोग प्रतिबंधक कायदा १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व भारतीय दंड संहिता १८६० अनुसार गुन्हा नोंद केला आहे.

Web Title: Breaking: Arbaaz Khan, Sohail Khan, his son Nirvan registered a crime against the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app