एनसीबीच्या तपासाला ब्रेक; पथकातील अधिकारी कोरोनाबाधित

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 02:25 AM2020-09-17T02:25:31+5:302020-09-17T02:29:52+5:30

तपासात बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर एनसीबीने आतापर्यंत सुशांतची मैत्रीण, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविकसह एकूण १८ जणांना अटक केली आहे. त्यामध्ये बहुतांश अमली पदार्थाची तस्करी करणारे आहेत.

Break to NCB investigation; Squad officers coronated | एनसीबीच्या तपासाला ब्रेक; पथकातील अधिकारी कोरोनाबाधित

एनसीबीच्या तपासाला ब्रेक; पथकातील अधिकारी कोरोनाबाधित

googlenewsNext

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासातून उघड झालेल्या ‘ड्रग्ज कनेक्शन’चा तपास करीत असलेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) तपासाला बुधवारी अचानक ब्रेक लागला. कारण, तपास पथकातील एका अधिकाऱ्याला कोरोना झाला आहे. त्यामुळे तातडीने संपूर्ण पथक क्वारंटाइन झाले.
तपासात बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर एनसीबीने आतापर्यंत सुशांतची मैत्रीण, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविकसह एकूण १८ जणांना अटक केली आहे. त्यामध्ये बहुतांश अमली पदार्थाची तस्करी करणारे आहेत. तिघांचा अपवाद वगळता अन्य सर्व जण न्यायालयीन कोठडीत आहेत. एनसीबीची त्यांच्याकडे चौकशी सुरू असतानाच पथकातील एका अधिकाºयाला दोन दिवसांपासून ताप, अंगदुखी व सर्दीचा त्रास जाणवत होता. कोरोनाची लक्षणे असल्याने स्वॅब तपासणीसाठी घेण्यात
आला होता. बुधवारी त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे खबरदारी म्हणून संपूर्ण पथकाने क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला. सर्वांची कोरोना चाचणी केली जाणार असल्याचे एनसीबीचे उपसंचालक केपीएस मल्होत्रा यांनी सांगितले.

जया सहा, श्रुती मोदीला परत पाठविले
ड्रग्जबद्दल रियाच्या मोबाइल चॅटवर संभाषणातून ज्यांची नावे पुढे आली ती सुशांतची माजी मॅनेजर श्रुती मोदी आणि टॅलेंट मॅनेजर जया सहा यांना बुधवारी एनसीबीने चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते, त्यानुसार सकाळी साडेदहाच्या सुमारास दोघी कार्यालयात पोहोचल्या. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पथक क्वारंटाइन झाल्याने दोघींना तातडीने परत पाठविण्यात आले असून, काही दिवसांनी त्यांना पुन्हा बोलाविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Break to NCB investigation; Squad officers coronated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.