गँगस्टर रवी पुजारीच्या हस्तकासह दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 06:12 IST2018-12-06T06:12:38+5:302018-12-06T06:12:47+5:30

चित्रपट निर्माते महेश भट यांच्यावर गोळीबार करण्यात सहभाग असलेल्या गँगस्टर रवी पुजारी टोळीतील शार्प शूटरसह दोघांना बुधवारी गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत.

Both gangsters arrested with Ravi Pujari's handwriting | गँगस्टर रवी पुजारीच्या हस्तकासह दोघांना अटक

गँगस्टर रवी पुजारीच्या हस्तकासह दोघांना अटक

मुंबई : चित्रपट निर्माते महेश भट यांच्यावर गोळीबार करण्यात सहभाग असलेल्या गँगस्टर रवी पुजारी टोळीतील शार्प शूटरसह दोघांना बुधवारी गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष ९ने केली असून, आरोपींकडून पिस्तूल आणि जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत.
सादिक इब्राहिम बंगाली उर्फ सलमान उर्फ बंता (४०) आणि धवल चंद्रप्पा देवरमनी (२६) अशी अटक हस्तकांची नावे आहेत. बंगाली हा रवी पुजारीच्या टोळीत शूटर म्हणून काम करत होता. २००६ मध्ये महेश भट यांच्यावर करण्यात आलेल्या गोळीबारात त्याचा हात होता. २०१५ मध्ये लोणावळ्यात एक दुहेरी हत्याकांड, तसेच २००८ मध्ये ऐरोलीचे नगरसेवक देवीदास चौगुले हत्याप्रकरणामध्येही त्याचा सहभाग असल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, पुजारी व त्याच्यात काही खटके उडाले आणि तो त्याच्यापासून वेगळा झाला. सध्या तो त्याची स्वत:ची टोळी बनविण्याच्या तयारीत होता. देवरमनी हा त्याचा साथीदार असून, शस्त्रास्त्र पुरविण्याचे काम करतो. शस्त्रास्त्रे घेऊन काही लोक बुधवारी सांताक्रुझ परिसरात येणार असल्याची माहिती कक्ष ९चे प्रमुख महेश देसाई यांना मिळाली. त्यानुसार, त्यांच्या पथकाने सापळा रचून त्यांना अटक केली.

Web Title: Both gangsters arrested with Ravi Pujari's handwriting

टॅग्स :Arrestअटक