Join us

वीज कामगारांना बोनस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 16:41 IST

Diwali News : समझोता करार

मुंबई : अदानी वीज कंपनीच्या स्‍थायी कामगारांना कमीत कमी बोनस व कुपन रक्‍कमेसह एकूण ४९ हजार ६०० ते जास्‍तीत जास्‍त ५९ हजार ९०० रक्‍कम देण्‍याचा समझोता करार करण्यात आला. कंत्राटी कामगारांना बोनस कमीत कमी १३ हजार ०५० तर जास्‍तीत जास्‍त १८ हजार ०५० + २५ दिवसापर्यंतची भर पगारी रक्‍कम प्रदान करण्‍याचा समझोता करार झाला.

या बोनसचा लाभ स्‍थायी, कंत्राटी, सुरक्षा रक्षक, साफसफाई कामगार, उपहारगृहातील कामगार, वाहन चालक व इतर कामगारांनाही होत आहे. स्‍थायी कामगारांना बोनस व कुपन रक्‍कमेचे वाटप झाले आहे. कंत्राटी व इतर कामगारांना बोनसचे वाटप झाले आहे. वाढीव दराने बोनस व २८ महिने प्रलंबित राहिलेला करारनामा लवकरात लवकर व्‍हावा म्‍हणून ९ नोंदणीकृत संघटना एकत्र येवून अदाणी इलेक्ट्रिसिटी कामगार संघर्ष समितीची स्‍थापना करण्‍यात आली.

टॅग्स :दिवाळीपैसाअर्थव्यवस्थामुंबईवीज