Join us
Daily Top 2Weekly Top 5

बेस्ट कर्मचाऱ्यांना अखेर मिळाला बोनस; बेस्टच्या तिजोरीवर ३८ कोटींचा भार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 01:43 IST

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी बेस्ट कर्मचाºयांना सानुग्रह अनुदान जाहीर झाले होते

मुंबई : महिनाभर सानुग्रह अनुदानाची वाट पाहणाºया बेस्ट कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपली. प्रशासनाने आश्वासन दिल्यानंतर बुधवारी दुपारी त्यांच्या खात्यात सानुग्रह अनुदानापोटी प्रत्येकी नऊ हजार १०० रुपये जमा झाले. यामुळे बेस्टच्या तिजोरीवर ३८ कोटींचा भार पडला आहे.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी बेस्ट कर्मचाºयांना सानुग्रह अनुदान जाहीर झाले होते. मात्र, सुधारित वेतनाच्या सामंजस्य करारावर सही करणाºया कर्मचाºयांना सानुग्रह अनुदान मिळेल, अशी नोटीस प्रशासनाने काढली होती. हे प्रकरण न्यायालयात गेल्यामुळेही सानुग्रह अनुदान वाटप अडचणीत आले होते. मात्र मंगळवारी बेस्ट समितीच्या बैठकीत आश्वासन दिल्याप्रमाणे बुधवारी दुपारी सर्व कर्मचाºयांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली.

टॅग्स :बेस्ट