कारच्या बोनेटवरून क्लीनअप मार्शलला नेले फरपटत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:06 IST2021-09-03T04:06:10+5:302021-09-03T04:06:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या एका क्लीनअप मार्शलला एका कार चालकाने चक्क कारच्या बोनेटवरून ...

From the bonnet of the car to the cleanup marshal | कारच्या बोनेटवरून क्लीनअप मार्शलला नेले फरपटत

कारच्या बोनेटवरून क्लीनअप मार्शलला नेले फरपटत

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या एका क्लीनअप मार्शलला एका कार चालकाने चक्क कारच्या बोनेटवरून चक्क फरपटत नेल्याचा प्रकार एका व्हायरल व्हिडिओतून समोर आला आहे. हा प्रकार पश्चिम द्रुतगती महामार्गावरील असून याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारची पोलिसांत तक्रार दाखल झालेली नाही.

कोराेनाच्या पार्श्वभूमीवर विना मास्क फिरणाऱ्यांवर मुंबईत क्लीनअप मार्शलच्या माध्यमातून कारवाई सुरू आहे. याबाबत पश्चिम द्रुतगती महामार्गावर कारवाई सुरू होती. यावेळी मास्क न घातल्याने कार चालकाला थांबविण्याचा प्रयत्न क्लीनअप मार्शल करत होते. तेव्हा चक्क कारवाईपासून वाचण्यासाठी या क्लीनअप मार्शलला कारच्या बोनेटवरून फरपटत नेले. तो वाकोला येथील व्हिडिओ असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र याप्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार करण्यात आल्याची अधिकृत माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली नाही.

Web Title: From the bonnet of the car to the cleanup marshal