Join us

श्रीदेवी यांच्या अकाली निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2018 07:10 IST

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचे शनिवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने दुबईत निधन झाले. त्यांच्या अकाली निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचे शनिवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने दुबईत निधन झाले. त्यांच्या अकाली निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी समजताच बॉलिवूड आणि सोशल मीडियात शोक व्यक्त करण्यात येत आहे. अभिनेते अमिताभ बच्चन, रितेश देशमुख, सिद्धार्थ मल्होत्रा, जॉनी लिव्हर, प्रियांका चोप्रा, प्रिती झिंटा, नेहा धुपिया, झरिन खान यांच्यासह अनेक बॉलिवूडच्या कलाकारांनी श्रीदेवी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

''न जाने क्यूँ , एक अजीब सी घबराहट हो रही है !!''  असे ट्विट अभिनेते अमिताभ बच्चन यांनी श्रीदेवी यांच्या निधनापूर्वी केले होते. असे ट्विट करत त्यांनी आपल्या मनातील एकप्रकारे भिती व्यक्त केली होती का? अमिताभ बच्चन यांना श्रीदेवी यांच्या कुटुंबियांनीच   ह्रदयविकार झटका आला त्यावेळी कळवले होते का? असा प्रश्न सोशल मीडियावर चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. 

 

प्रियांका चोप्राने शोक व्यक्त करताना ट्विटरवर लिहिले की, माझ्याकडे शब्द नाहीत. सर्वांकडून श्रीदेवींना श्रद्धांजली. आजचा काळा दिवस.   

 

टॅग्स :श्रीदेवीबॉलिवूड