बोईसरला गुटख्याचा मोठा साठा जप्त

By Admin | Updated: May 20, 2014 01:58 IST2014-05-20T01:44:45+5:302014-05-20T01:58:04+5:30

येथील रामचंद्र नगरमधील गोडाऊनमध्ये बेकायदेशीर गुटख्याचा साठा करून त्या गुटख्याची विक्री बोईसर परिसरात होते

Boisar seized huge stock of gutka | बोईसरला गुटख्याचा मोठा साठा जप्त

बोईसरला गुटख्याचा मोठा साठा जप्त

बोईसर : येथील रामचंद्र नगरमधील गोडाऊनमध्ये बेकायदेशीर गुटख्याचा साठा करून त्या गुटख्याची विक्री बोईसर परिसरात होते याची खबर बोईसर पोलिसांना मिळताच दोन पंचासह छापा घालण्यात आला. यात २ लाख ८४ हजार रू. किमतीचा गुटखा, पान मसाला व सुगंधी तंबाखू पकडण्यात आला आहे. याप्रकरणी बोईसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बोईसर पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक जे. एस. नाळे व पोलीस नाईक एल. व्ही. सूर्यवंशी बोईसर शहरात पेट्रोलिंग करीत असताना रामचंद्र नगर येथील इनामुल्ला अफिरूहेमान शेख याने बेकायदेशीर गुटख्याचा साठा केल्याची खबर मिळताच छापा टाकून मुद्देमाल पकडल्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी अरविंदकुमार खडके यांनी फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक करण्यात आली आहे. धाडीचे सत्र वाढल्यास बेकायदा गुटखाविक्रीला आळा बसेल.(वार्ताहर)

Web Title: Boisar seized huge stock of gutka