Join us

बेडमध्ये लपवून ढेवलेला महिलेचा मृतदेह, मारेकरी पती घटनास्थळावरून फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 20:35 IST

तुळींजच्या जीवदानी नगर येथील घटना

नालासोपारा(मंगेश कराळे) : पूर्वेकडील तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४० वर्षीय महिलेची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. तीन ते चार दिवसांपूर्वी पतीने ही हत्या करून मृतदेह बेडमध्ये लपवून घटनास्थळावरून पलायन केल्याचे माहिती समोर येत आहे. हत्येची व मृतदेहाची माहिती मिळताच तुळींज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठविण्यात आले आहे. तुळींज पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून फरार आरोपी पतीचा शोध सुरू केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, तुळींजच्या जीवदानी नगरमधील सीता सदन येथे राहणाऱ्या मेघा शहा (४०) यांची हत्या झाली आहे. सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तुळींज पोलिसांना या ठिकाणी उग्र वास येत असल्याची माहिती मिळाली होती. माहिती मिळताच तुळींज पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. ही हत्या का आणि कोणत्या कारणासाठी करण्यात आली याचा पोलीस शोध घेत आहेत. पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने मावशीला मारल्याचा मॅसेज व्हॉट्सएपवर केल्याचेही सूत्रांकडून कळते आहे.

टॅग्स :गुन्हेगारीमुंबई