अंधेरीत राहत्या घरी आढळला मॉडेलचा मृतदेह
By Admin | Updated: June 12, 2017 22:15 IST2017-06-12T22:15:12+5:302017-06-12T22:15:12+5:30
अंधेरीच्या आरटीओ लेनमधील इमारतीतील फ्लॅटमध्ये एका मॉडेलचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सोमवारी सापडला. याप्रकरणी अंबोली पोलिसांनी अपघाती मृत्युची नोंद केली असुन चौकशी सुरु आहे.

अंधेरीत राहत्या घरी आढळला मॉडेलचा मृतदेह
ऑनलाइन लोकमत
मुंबई : अंधेरीच्या आरटीओ लेनमधील इमारतीतील फ्लॅटमध्ये एका मॉडेलचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सोमवारी सापडला. याप्रकरणी अंबोली पोलिसांनी अपघाती मृत्युची नोंद केली असुन चौकशी सुरु आहे.
कृतिका चौधरी (२५) असे या मयत तरुणीचे नाव असुन ती स्ट्रगलिंग अॅक्टर आहे. हरिद्वारची राहणारी कृतिका अंधेरी पश्चिमच्या चार बंगलो परिसरात भैरवनाथ एसआरए सोसायटीत राहत होती. सोमवारी तिच्या घरातुन उग्र वास येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पाऊणे चारच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षावर फोन केला. त्यानुसार अंबोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घराचा बाहेरून बंद असलेला उघडत घरात प्रवेश केला. तेव्हा कुजलेल्या अवस्थेतील कृतिकाचा मृतदेह त्याना सापडला. जो त्यांनी ताब्यात घेत स्थानीक रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. तीन ते चार दिवसांपुर्वी तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमीक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी सध्या अपघाती मृत्युची नोंद केली गेली असुन तिची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना असुन याप्रकरणी अधीक चौकशी सुरु आहे.