महिलेची हत्या करीत भंगारच्या कंटेनरमध्ये लपवला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:07 IST2021-06-09T04:07:26+5:302021-06-09T04:07:26+5:30

गोवंडीतील घटना हत्येनंतर भंगारच्या कंटेनरमध्ये लपवला महिलेचा मृतदेह गोवंडीतील घटना लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गोवंडीत एका महिलेची हत्या ...

Body hidden in debris container, killing woman | महिलेची हत्या करीत भंगारच्या कंटेनरमध्ये लपवला मृतदेह

महिलेची हत्या करीत भंगारच्या कंटेनरमध्ये लपवला मृतदेह

गोवंडीतील घटना

हत्येनंतर भंगारच्या कंटेनरमध्ये लपवला महिलेचा मृतदेह

गोवंडीतील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गोवंडीत एका महिलेची हत्या करून तिचा मृतदेह एका भंगार कंटेनरमध्ये लपवल्याची घटना समोर आली आहे. तिची ओळख पटली नसून, याप्रकरणी गोवंडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चेंबूरच्या अन्वर कंपाऊंडमधील गोडाऊन कम वर्कशॉपमध्ये ५ जून रोजी दुपारी ३ वाजता एका महिलेची हत्या करण्यात आली. पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह प्लास्टिकच्या ताडपत्रीत गुंडाळून तो एका वापरात नसलेल्या कंटेनर शेडमध्ये लपवून ठेवला हाेता. रविवारी याबाबत समजताच, गोवंडी पोलिसांनी नरेश राठोड यांच्या फिर्यादीवरून अनोळखी व्यक्तीविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंद केला. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून परिसरातील स्थानिक रहिवासी तसेच वर्क शॉपमधील कर्मचाऱ्यांची पाेलीस अधिक चौकशी करीत आहेत.

...............................................................

Web Title: Body hidden in debris container, killing woman