Join us

मुंबईत वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह आढळले, दरोड्याच्या उद्देशाने हत्येचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2018 19:30 IST

घरामध्ये दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दोघांची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. 

मुंबई- खार भागातील एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. घरामध्ये दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दोघांची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. मुंबईतील वांद्रे पश्चिम भागातील एकता डिलाइट या इमारतीत मखिजा दाम्पत्य राहत होतं. आज सकाळी 85 वर्षीय नानक मखिजा आणि त्यांच्या 81 वर्षीय पत्नी दया मखिजा यांचे मृतदेह आढळले. या घटनेमुळे खार परिसरात खळबळ उडाली आहे.बुधवारी रात्री या दाम्पत्याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरोड्याच्या उद्देशाने मखिजा दाम्पत्याची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला जातो आहे.दरम्यान, या प्रकरणी खार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून  पोलिसांकडून पुढील तपास केला जातो आहे.  

टॅग्स :गुन्हाखूनमुंबई