Join us  

कंगनाच्या पाली हिलमधील कार्यालयाची बीएमसीकडून पाहणी; लवकरच होणार कारवाई?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2020 2:34 PM

कंगना राणौतच्या कार्यालयासह शेजारील बंगल्यांचीदेखील अधिकाऱ्यांकडून पाहणी

मुंबई: अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यात जोरदार वाकयुद्ध रंगलं आहे. मी मुंबईला येतेय. हिंमत असेल तर रोखून दाखवा, असं आव्हान कंगनानं शिवसेनेला दिलं आहे. यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयानं कंगनाला वाय दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला. आता कंगनाच्या कार्यालयाची मुंबई महापालिकेकडून पाहणी करण्यात येत आहे. कंगनाचं पाली हिलमधील कार्यालय अनधिकृत तर नाही ना, याची तपासणी पालिकेनं सुरू केली आहे.अभिनेत्री कंगना राणौतला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून वाय दर्जाची सुरक्षा९ सप्टेंबरला कंगना मुंबईत येणार आहे. हिंमत असेल तर मला अडवून दाखवा, असं थेट आव्हान तिनं शिवसेनेला दिलं आहे. आज केंद्रानं कंगनाला वाय दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला. मुंबईतील खारमध्ये कंगनाचं घर आहे. पाली हिल परिसरात तिचं कार्यालय आहे. या कार्यालयाची आज मुंबई महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी पाहणी केली. कार्यालय अनधिकृत नाही ना, रस्त्यावर अतिक्रमण तर झालेलं नाही ना, याची तपासणी करण्यासाठी अधिकारी आले होते.'कंगनासारखे 'उपरे' आणि डिनो, गोमेझ, जॅकलिन, पटानी अस्सल मराठी!' नितेश राणेंचा शिवसेनेला टोलाकंगनाच्या कार्यालयात सध्या रंगरंगोटीचं काम सुरू आहे. त्यांचीही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी जुजबी चौकशी केली. कार्यालयाशेजारी असणाऱ्या बंगल्यांचीदेखील पाहणी करण्यात आली. यावेळी अधिकाऱ्यांनी शेजारीच असलेल्या रस्त्यांचीही मापं घेतली. त्यामुळे आता पालिका काय कारवाई करणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. शिवसेनेकडून छ. शिवाजी महाराजांचा अपमान; काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी संजय राऊतांना सुनावलंकंगनाला पुरवण्यात आलेल्या सुरक्षेवरून आज महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजपाला लक्ष्य केलं. अभिनेत्री कंगना राणौत भाजपच्या पोपट आहेत. त्यामुळेच त्यांना केंद्राकडून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. त्या भविष्यात राज्यसभेत दिसल्यास नवल वाटणार नाही, असं काँग्रेस नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनीदेखील कंगनाला मिळालेल्या सुरक्षेवरून मोदी सरकारला लक्ष्य केलं. स्वत:चा अजेंडा रेटणाऱ्यांची काळजी भाजपचं सरकार घेत असतं. त्यामुळे अभिनेत्री कंगना राणौतला केंद्राकडून मिळालेल्या वाय दर्जाच्या सुरक्षेचं आश्चर्य वाटत नाही, असी टीका सावंत यांनी केली. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींनीदेखील कंगनावर निशाणा साधला. महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांना इथे राहण्याचा अधिकार नाही. भाजप-संघाची भाषा बोलणाऱ्या कंगनानं महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.काय आहे प्रकरण?अभिनेत्री कंगना राणौतनं संजय राऊत यांनी आपल्याला धमकी दिल्याचा दावा केला होता. 'मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्यास पुन्हा शहरात येऊ नकोस, असं म्हणत मला राऊत यांनी धमकी दिली असं ती म्हणाली. आधी झळकलेले आझादीचे फलक आणि आता मिळत असलेल्या उघड धमक्या यामुळे मुंबई पाकिस्तान व्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे?' असा सवाल कंगनानं ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला होता.काय म्हणाले संजय राऊत?कंगनानं महाराष्ट्राची माफी मागितली तर तिला माफ करण्याचा विचार करु, तिने मुंबईचा उल्लेख मिनी पाकिस्तान केला आहे. तिच्यात हिंमत असेल तर जे मुंबईबद्दल बोलली तेच अहमदाबादविषयी बोलेल का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. संजय राऊत यांनी कंगनाबद्दल एक आक्षेपार्ह शब्द वापरला.मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर अडवा; कंगनाचे खुले आव्हान"मला अनेक जण मुंबईला परत न येण्याची धमकी देत ​​आहेत, म्हणून मी ठरवले आहे की, येत्या आठवड्यात ९ सप्टेंबरला मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आहे. मी मुंबई विमानतळावर किती वाजता उतरणार, याची वेळ लवकरच सांगेन. कोणाच्या बापात हिंमत असेल तर आडवा", असे आव्हान कंगनाने दिले आहे.

टॅग्स :कंगना राणौतशिवसेनाविजय वडेट्टीवार