Join us
Daily Top 2Weekly Top 5

BMC: शिंदेसेनेचे ‘ते’ दोन माजी नगरसेवक होणार ‘स्वीकृत’?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 06:41 IST

BMC Nominated Councillors: मुंबई महानगरपालिकेच्या नव्या सभागृहात एन्ट्री मिळवण्यासाठी आता वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. तिकीट नाकारलेले माजी नगरसेवक आणि पराभूत उमेदवारांनी 'स्वीकृत सदस्य' म्हणून वर्णी लागावी यासाठी फिल्डिंग लावली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: नव्या सभागृहात नगरसेवक म्हणून अर्थात स्वीकृत सदस्य म्हणून आपली वर्णी लागावी यासाठी काही पराभूत उमेदवारांसह, तिकीट नाकारलेल्या काही माजी  नगरसेवकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. पण शिंदेसेनेकडून तिकीट नाकारलेल्या दोन माजी नगरसेवकांची  स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती केली जाणार असल्याचे समजते. भाजपमधून मात्र अद्याप कोणत्याही नावाची चर्चा नाही.

शिंदेसेनेने यंदा चार माजी नगरसेवकांना तिकीट नाकारले होते.  त्यापैकी दोन नगरसेवकांना स्वीकृत नगरसेवक म्हणून घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते, असे खात्रीलायकरीत्या कळते. संख्याबळानुसार स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होते. त्यानुसार भाजपच्या कोट्यातून चार सदस्य नियुक्त केले जातील. मात्र ते सदस्य कोण असतील, हे भाजपमधील नेतेही ठामपणे सांगू शकत नाहीत. भाजपची एकूण कार्यपद्धती पाहता ‘फिल्डिंग’ लावूनही काही फायदा नाही, याची ‘समज’ असलेल्या मंडळींनी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे. तर संख्याबळानुसार काँग्रेसचा  एकच सदस्य नियुक्त होणार आहे. 

काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस हे मागाठाणेतून पराभूत झाले होते. त्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. भाजपच्या पातळीवर मात्र शांतता आहे. ‘आमच्या पक्षात शेवटपर्यंत अंदाज बांधता येत नाही, त्यामुळे शांत राहणे योग्य’, अशी प्रतिक्रिया एका माजी ज्येष्ठ नगरसेवकाने दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : BMC: Two Shinde Sena Ex-Corporators Likely to Become 'Accepted' Members?

Web Summary : Two ex-corporators denied tickets by Shinde Sena may become accepted members in BMC. BJP's choices remain unclear, adopting a 'wait and watch' approach. Congress may nominate Sureshchandra Rajhans.
टॅग्स :मुंबईभाजपाशिवसेनाराजकारण