Ritu Tawde Expensive Watch: भाजपाने तब्बल ४४ वर्षांनंतर आपला महापौर बसवत मुंबई महापालिकेवर भगवा फडकवला. इतक्या वर्षांत जे कोणाला जमले नाही ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं. मुंबई महापालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या रितू तावडे आणि उपमहापौरपदी शिंदेसेनेचे संजय घाडी यांची निवड झाली. आपल्या कामामुळे रितू तावडे या सध्या खूप चर्चेत आहेत. पण सध्या त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये रितू तावडे यांनी घातलेल्या घड्याळाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. घड्याळाची किंमत कोट्यवधीत असल्याचा मोठा दावा करण्यात आला. त्याची चर्चा रंगली. Rolex कंपनीच्या या घड्याळाची किंमत भारतात १ कोटीच्या आसपास असल्याचं म्हटलं गेलं. यावरून महापौरांना ट्रोलही करण्यात आलं. यावर आता रितू तावडे यांनी घड्याळावर स्पष्टीकरण देत खरं काय ते सांगितलं आहे.
आपल्या ट्विटर अकाऊंटवरून रितू तावडे यांनी घड्याळाबाबत माहिती दिली आहे. "ही पोस्ट पूर्णपणे खोटी व दिशाभूल करणारी आहे. माझ्या हातातील घड्याळ Michael Kors कंपनीचे आहे, ते Rolex Daytona नाही. त्यामुळे लाखो-कोट्यवधींचा प्रश्नच उद्भवत नाही. अफवा पसरवणे हा बेजबाबदारपणा आणि जाणीवपूर्वक बदनामीचा प्रयत्न आहे. अशा खोट्या आरोपांना मी भीक घालत नाही" असं महापौरांनी म्हटलं आहे.
घड्याळावरून सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल झाल्या. "घड्याळाची आवड असल्यामुळे महापौरच्या हाताकडे लक्ष गेले. एकदम महागडे...Yellow gold Rolex Daytona light dial. माझ्याकडून रिस्पेक्ट ... रिटेल किंमत ६०-७० लाख ... भारतातली मार्केट किंमत १ करोडपेक्षा जास्त" असं म्हणत घड्याळ एक कोटीचं असल्याचा दावा करण्यात आला होता. त्याला आता रितू तावडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Web Summary : Mumbai Mayor Ritu Tawde clarified that the watch she wore, rumored to be a one crore Rolex, is actually a Michael Kors watch. She dismissed the claims as false and a deliberate attempt to defame her.
Web Summary : मुंबई की महापौर रितु तावड़े ने स्पष्ट किया कि उनकी घड़ी, जिसके एक करोड़ की रोलेक्स होने की अफवाह थी, वास्तव में माइकल कोर्स की है। उन्होंने इन दावों को झूठा और बदनाम करने का प्रयास बताया।