मुंबई - मुंबईचे महापौरपद कोणाला द्यावे, भाजपच्या गटनेतेपदी कोण असले पाहिजे, याबाबत पक्षाचे मुंबईतील नेते, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची मते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर मंगळवारी रात्री झालेल्या बैठकीत जाणून घेतल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.
मुंबईतील पक्षाच्या मोठ्या विजयानंतर फडणवीस यांनी महापौरपद आणि अन्य पदांबाबत चर्चा करण्यासाठी या नेत्यांना वर्षा बंगल्यावर बोलविले होते. सुरुवातीला त्यांनी निवडणुकीतील यशाबद्दल सर्वांचे अभिनंदन केले आणि आता मुंबईकरांच्या आपल्याबद्दल मोठ्या अपेक्षा आहेत व त्या पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल, असे सांगितले. यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई अध्यक्ष अमित साटम, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उपस्थित होते. साधारणत: १५ मिनिटे सर्वांशी चर्चा केल्यानंतर आपण प्रत्येकाशी स्वतंत्रपणे बोलू इच्छितो, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
त्यानंतर स्वत: मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष चव्हाण आणि अमित साटम या तिघांनी एकेकाशी चर्चा करून महापौरपदाच्या नावाबाबत तसेच भाजप गटनेत्याच्या नावाबाबत मते जाणून घेतली. माजी खा. गोपाळ शेट्टी, मंत्री लोढा, आ. अतुल भातखळकर, आ. मनीषा चौधरी, आ. प्रवीण दरेकर, आ. पराग अळवणी, मधु चव्हाण, प्रकाश मेहता, भाई गिरकर यांच्याशी त्यांनी चर्चा केल्याची माहिती आहे. महापौरपद आणि स्थायी समितीचे अध्यक्षपदही भाजपकडेच घ्या असा आग्रह सर्वांनीच धरला.
शिंदेसेनेच्या आग्रहामुळे भाजपमध्ये अस्वस्थतामुंबईचे महापौरपद आपल्याला द्या, असा आग्रह शिंदेसेनेकडून धरला जात असल्याने भाजपच्या गटात अस्वस्थता असल्याचे बोलले जाते. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षात महापौरपद मिळायला हवे असा शिंदेसेनेचा आग्रह असल्याचे म्हटले जाते. तथापि, मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंगळवारच्या भाजप नेत्यांच्या बैठकीत महापौरपदाच्या नावांविषयी पक्षाच्या नेत्यांना विचारणा केली याचा अर्थ महापौरपद भाजपकडेच राहणार, असा घेतला जात आहे.
Web Summary : Chief Minister Fadnavis sought opinions from BJP leaders regarding Mumbai's mayoral candidate. Discussions involved potential names for the mayoral position, amidst unease due to Shinde Sena's claim. BJP leaders unanimously favored retaining both the mayoral and standing committee chairperson posts.
Web Summary : मुख्यमंत्री फडणवीस ने मुंबई के महापौर पद के लिए भाजपा नेताओं से राय मांगी। शिंदे सेना के दावे से बेचैनी के बीच महापौर पद के संभावित नामों पर चर्चा हुई। भाजपा नेताओं ने सर्वसम्मति से महापौर और स्थायी समिति के अध्यक्ष पद दोनों को बरकरार रखने का समर्थन किया।