मागील काही दिवसापासून मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी कोणाची निवड होणार, हे पद भाजपाकडे जाणार की शिवसेनेला मिळणार या चर्चा सुरू होत्या. या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. मुंबई मनपाच्या महापौरपदी भाजपकडून रितू तावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. तर उपमहापौरपदासाठी शिवसेनेकडून नगरसेवक संजय घाडी यांच्या नावाची घोषणा केली.
राहुल शेवाळे यांनी उप महापौर पदासाठी शिंदे सेनेकडून प्रभाग क्रमांक ४ चे नगरसेवक संजय घाडी याच्या नावाची घोषणा केली. उप महापौर पदाचा कालावधी सव्वा वर्षे असेल.
- रितू तावडे १३२ प्रभाग क्रमांकाच्या नगरसेविका आहेत. त्या दोनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. तसेच त्यांनी या आधी मुंबई मनपाच्या शिक्षण समितीचं अध्यक्षपद भूषवलं आहे. मुंबई मनपाच्या स्थापत्य समितीच्या उपाध्यक्ष देखील राहिल्या आहेत. ईशान्य मुंबईच्या आक्रमक चेहरा म्हणून त्या ओळखल्या जातात. त्यांनी या आधी वीज दरवाढीविरोधात आक्रमक आंदोलन केले होते.
Web Summary : BJP declared Ritu Tawade as their Mumbai Mayor candidate. Shiv Sena's Sanjay Ghadi will be the Deputy Mayor for a term of 1.25 years. Tawade, a two-time corporator, previously headed the education committee and served as vice-chair of the building committee.
Web Summary : भाजपा ने रितु तावडे को मुंबई का महापौर उम्मीदवार घोषित किया। शिवसेना के संजय घाडी 1.25 वर्ष के कार्यकाल के लिए उपमहापौर होंगे। दो बार की पार्षद तावडे पहले शिक्षा समिति की प्रमुख और भवन समिति की उपाध्यक्ष रह चुकी हैं।