बचतगटांच्या उत्पादनांना व्यासपीठ; महापालिका, ‘एसएनडीटी’ ॲप विकसित करणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 10:50 AM2024-04-13T10:50:09+5:302024-04-13T10:51:06+5:30

महिला बचत गटांच्या उत्पादनांना ऑनलाइन बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी ॲपच्या माध्यमातून यंत्रणा विकसित करण्याच्या सूचना पालिकेने दिल्या आहेत.

bmc has decided to develop an app with the help of sndt university to make the product made by 10 thousand women self help group | बचतगटांच्या उत्पादनांना व्यासपीठ; महापालिका, ‘एसएनडीटी’ ॲप विकसित करणार 

बचतगटांच्या उत्पादनांना व्यासपीठ; महापालिका, ‘एसएनडीटी’ ॲप विकसित करणार 

मुंबई :मुंबईतील १० हजार महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना ऑनलाइन बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उत्पादनांचे मार्केटिंग आणि ब्रॅंडिंग करण्यासाठी एसएनडीटी विद्यापीठाच्या मदतीने ॲप विकसित करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्याचबरोबर ग्राहकांनी मागणी नोंदवल्यानंतर मुंबईतील डबेवाल्यांच्या मदतीने ही उत्पादने त्यांना घरपोहोच दिली जाणार आहेत.

महिला बचत गटांच्या उत्पादनांना ऑनलाइन बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी ॲपच्या माध्यमातून यंत्रणा विकसित करण्याच्या सूचना पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिले आहेत. ॲपमध्ये समाविष्ट असणाऱ्या उत्पादनांसाठी एक विशिष्ट गुणवत्ता परीक्षण, दळणवळण व्यवस्था अशा सगळ्या निकषांची पूर्तता करणाऱ्या उत्पादनांचा समावेश असावा, तसेच उत्पादनांचे चांगले ब्रॅंडिंग आणि मार्केटिंग व्हावे, अशा सूचना डॉ. शिंदे यांनी दिल्या आहेत. 

वस्तू घरपोहोच देण्यासाठी डबेवाल्यांची मदत -

मुंबईतील सुमारे १० हजार महिला बचत गटांच्या माध्यमातून एक लाखाहून अधिक महिला विविध प्रकारच्या वस्तू आणि उत्पादने तयार करत आहेत. त्यात खाद्य पदार्थांपासून विविध वस्तू आहेत. या उत्पादनांना चांगली बाजारपेठ मिळावी, म्हणून ॲपमध्ये ठराविक वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात येतील. ॲप विकसित करण्यासाठी महापालिकेने एसएनडीटी विद्यापीठासोबत सामंजस्य करारही केला आहे. या विद्यापीठाच्या इनक्युबेशन सेंटरच्या माध्यमातून ॲप विकसित करण्यात येणार आहे. तर, उत्पादने घरपोहोच देण्यासाठी डबेवाल्यांची मदत घेण्यात येणार आहे.    
- डॉ. प्राची जांभेकर, संचालिका, नियोजन विभाग

या समितीत सरहद संस्थेचे संजय नहार, अर्हम संस्थेचे डॉ. शैलेश पगारिया  तसेच स्पर्धा संचालक सुमंत वाईकर तसेच तांत्रिक संचालक वसंत गोखले हे आहेत. या स्पर्धेचे मुख्य मार्गदर्शक मेजर जनरल सचिन मलिक (लडाख लष्कर मुख्यालय) हे आहेत.

Web Title: bmc has decided to develop an app with the help of sndt university to make the product made by 10 thousand women self help group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.