पालिकेने काशिमीरा भागातील २१ बेकायदा बांधकामे केली जमीनदोस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 03:46 PM2020-10-10T15:46:01+5:302020-10-10T15:46:58+5:30

काशिमीरा भागातील इकोसेन्सेटिव्ह झोन व नाविकास क्षेत्रात राजरोस बेकायदेशीर बांधकामे होत आहेत . यातील बहुतांश जागा ह्या आदिवासी वा सरकारी आहेत

BMC has carried out 21 illegal constructions in Kashmir area | पालिकेने काशिमीरा भागातील २१ बेकायदा बांधकामे केली जमीनदोस्त

पालिकेने काशिमीरा भागातील २१ बेकायदा बांधकामे केली जमीनदोस्त

Next

मीरारोड - काशिमीरा भागातील २१ बेकायदेशीर बांधकामांवर मीरा भाईंदर महापालिकेच्या वतीने शुक्रवारी तोडक कारवाई केली गेली . ह्या भागातील बेकायदा बांधकाम करणाऱ्या माफियांनी  धुमाकूळ घातला असून प्रचंड मोठी झोपडपट्टी उभी राहिली आहे.

काशिमीरा भागातील इकोसेन्सेटिव्ह झोन व नाविकास क्षेत्रात राजरोस बेकायदेशीर बांधकामे होत आहेत . यातील बहुतांश जागा ह्या आदिवासी वा सरकारी आहेत , तर काही पालिका आरक्षणातील व खाजगी सुद्धा आहेत . येथे राजरोस बेकायदेशीर बांधकाम उभी राहून त्याला कर आकारणी , वीज व पाणी पुरवठ्या सह अन्य सोयी सुविधा मिळत असताना स्थानिक नगरसेवक , राजकारणी आणि पालिका अधिकारी मात्र ठोस कारवाईची भूमिकाच घेत नाहीत. 

स्थानिक पालिका अधिकाऱ्यांचे लागेबांधे असल्याने आता आयुक्त डॉ . विजय राठोड ह्यांनी अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अजित मुठे ह्यांच्यावरच कारवाईसाठी जबाबदारी सोपवली आहे . मुठे ह्यांनी देखील प्रभाग अधिकाऱ्यांना नोटीस बजावून कारवाई करायला लावणे सुरु केले आहे. शुक्रवारी पालिकेचे कनिष्ठ अभियंता संदिप साळवे व विकास शेळके यांनी काशिमीऱ्यातील दाचकूलपाडा, मीनाक्षी नगर परिसरातील बेकायदा २१ बांधकामांवर कारवाई केली . या ठिकाणी आवेश कुरेशी,  मंगेश पाष्टे ह्या माफियांनी केलेली बेकायदा बांधकामे पाडण्यात आली. बेकायदा बांधकामे करणाऱ्यांवर एमआरटीपी नुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुठे ह्यांनी दिले आहेत.

Web Title: BMC has carried out 21 illegal constructions in Kashmir area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.