Join us
Daily Top 2Weekly Top 5

BMC Elections Result 2026 : मुंबईत भाजपा, उद्धवसेना, मनसे, शिंदेसेनेने नक्की किती जागा जिंकल्या, सात वाजेपर्यंतचा निकाल काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 19:56 IST

BMC Elections Result 2026 : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. आता सात वाजेपर्यंतची आकडेवारी समोर आली आहे.

BMC Elections Result 2026 : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. भाजपाने मुसंडी मारली आहे. ठाकरे बंधूंना मोठा झटका बसल्याचे दिसत आहे. निकाल जाहीर होत असतानाच राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, आता सात वाजेपर्यंतची आकडेवारी समोर आली आहे.

रात्री 7 वाजेपर्यंत भाजप आघाडीवर होते तर ३८ प्रभागांचे निकाल बाकी अजूनही बाकी आहेत.  मुंबई महानगरपालिकेच्या २०२६ च्या निवडणुकीचा निकाल जाहीर होत असून, रात्री ७ वाजेपर्यंत २२७ पैकी १८९ प्रभागांचे निकाल स्पष्ट झाले आहेत. उर्वरित ३८ प्रभागांचे निकाल अद्याप जाहीर व्हायचे असून, अंतिम सत्तास्थितीबाबत उत्सुकता कायम आहे.

रात्री ७ वाजताच्या आकडेवारीनुसार भाजप सर्वाधिक ७३ जागांसह आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) ५९ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेला २० जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसने १९ जागांवर विजय मिळवला असून एमआयएमने ८ जागा जिंकल्या आहेत.

मनसेला आतापर्यंत ५ जागा मिळाल्या असून, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाला प्रत्येकी २ जागा मिळाल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) केवळ १ जागेवर आघाडीवर आहे.

रात्री ७ वाजताची पक्षनिहाय स्थिती

भाजप – ७३

शिवसेना (ठाकरे गट) – ५९

शिवसेना (शिंदे गट) – २०

काँग्रेस – १९

एमआयएम – ०८

मनसे – ०५

राष्ट्रवादी काँग्रेस –०२

समाजवादी पक्ष – ०२

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – ०१

एकूण निकाल : १८९ / २२७बाकी प्रभाग : ३८

दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी अजूनही काही जागा निर्णायक ठरणार आहेत. उर्वरित प्रभागांच्या निकालांनंतरच मुंबई महापालिकेतील अंतिम सत्तासमीकरण स्पष्ट होणार असून, सर्व पक्षांचे लक्ष आता उरलेल्या मतमोजणीकडे लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : BMC Elections 2026: BJP Leads, Thackeray Faction Trails; Results Update

Web Summary : BJP leads in BMC Elections 2026 with 73 seats. Thackeray's Shiv Sena follows with 59. Shinde's Sena secured 20, Congress 19. Results for 38 wards are pending, determining final power dynamics.
टॅग्स :मुंबई महापालिका निवडणूक निकाल २०२६निवडणूक 2026शिवसेनाभाजपा