Join us
Daily Top 2Weekly Top 5

BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; एकूण ५१ शिलेदार मैदानात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 22:58 IST

Aam Aadmi Party: मुंबई महानगरपालिकेसाठी आम आदमी पार्टीने आतापर्यंत एकूण ५१ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय समीकरणे अद्याप गुलदस्त्यात असताना आम आदमी पार्टीने उमेदवारांच्या निवडीत मोठी आघाडी घेतली. आपने आज १५ उमेदवारांची आपली तिसरी यादी जाहीर केली असून, आतापर्यंत जाहीर केलेल्या एकूण उमेदवारांची संख्या ५१ वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, पक्षाने यावेळी सामाजिक कार्यकर्ते आणि नागरी प्रश्नांवर लढा देणाऱ्या सिव्हिक हिरोजना मैदानात उतरवले आहे.

पक्षाच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी यादी जाहीर करताना इतर राजकीय पक्षांवर जोरदार निशाणा साधला. त्या म्हणाल्या, "एकीकडे राजकीय अपरिहार्यता आणि जागावाटपामुळे इतर पक्षांना अद्याप आपली युती निश्चित करता आलेली नाही. मात्र, आम आदमी पार्टीने कोणत्याही दबावाशिवाय आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांना आणि जनतेच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या नायकांना उमेदवारी दिली आहे."

भाजप, काँग्रेस आणि शिवसेनेवर टीका

मेनन पुढे म्हणाल्या की, "आम आदमी पार्टीला तळागाळातून जनतेचा भरघोस पाठिंबा मिळत आहे. भाजपचा गैरकारभार आणि त्याला साथ देणाऱ्या काँग्रेस व शिवसेनेला मुंबईकर आता कंटाळले आहेत. मुंबई आणि मुंबईकर नक्कीच यापेक्षा चांगल्या कारभाराचे हकदार आहेत. जो केवळ आपच देऊ शकतो."

English
हिंदी सारांश
Web Title : BMC Elections: AAP announces third list, 51 candidates in fray.

Web Summary : AAP declared its third list of 15 candidates for the BMC elections, bringing the total to 51. AAP criticizes other parties' alliances, emphasizing its commitment to fielding dedicated workers and addressing public issues, promising better governance for Mumbai.
टॅग्स :महानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक २०२६आपअरविंद केजरीवालभाजपाशिवसेना