Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘देवाच्या मनात असेल तर…’, उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ विधानावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 19:02 IST

BMC Elections 2026:

मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता महापौरपदासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यात ही निवडणूक अटीतटीची होऊन त्यात महायुतीला निसटतं बहुमत मिळाल्याने ठाकरे बंधूंच्या युतीलाही महापौरपदासाठी आशेचा किरण दिसत आहे. तसेच संख्याबळाचं गणित जुळवून काही तरी चमत्कार घडवता येईल, असे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. देवाच्या मनात असेल तर मुंबईत आपला महापौर बसेल, अशी आशा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती. त्याला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

उद्धव ठाकरे यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी ज्या देवाचा उल्लेख केला तो माझ्याबाबत होता की वरच्या देवाबाबत होता, मलाही देवा म्हणतात म्हणून मी हे विचारतोय. पण यावेळी मुंबईमध्ये महायुतीचा महापौर करायचा आहे हे वरच्या देवानेच ठरवलेलं आहे. त्यामुळे मुंबईत आमचाच महापौर होईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, काल लागलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपा आणि शिंदेसेनेच्या महायुतीला ११८ जागांवर विजय मिळाला. त्यात ८९ जागांवर भाजपाचे तर २९ जागांवर शिंदेसेनेचे नगरसेवक निवडून आले. तर दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या युतीला ७२ जागा मिळाल्या आहेत. त्यात उद्धवसेनेला ६५, मनसेला ६ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला १ जागा मिळाली आहे. याशिवाय काँग्रेसला २४ जागा मिळाल्या आहेत. तसेच एमआयएमला ८, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला ३ आणि उर्वरित जागा इतरांना मिळाल्या आहेत. त्यामुळे महापौरपदाच्या निवडीबाबत चुरस वाढली आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Fadnavis responds to Thackeray's 'God' remark on Mumbai mayor election.

Web Summary : Following BMC election results, Fadnavis retorted to Uddhav Thackeray's 'God' remark about their mayoral hopes, confidently stating the Mahayuti will secure the Mumbai mayor position with divine favor. BJP and Shinde Sena secured 118 seats.
टॅग्स :महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक निकाल २०२६मुंबई महानगरपालिकाउद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीस