मुंबई महापालिकेची यावेळची निवडणूक अत्यंत चुरशीची होताना दिसत आहे. महापालिका निवडणुकीसाठी मनसे आणि उद्धवसेनेने युती केली आहे. दुसरीकडे भाजपानेही शिंदेसेनेला सोबत घेतले आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी जोरदार तयारी सुरू असून, फोडाफोडी रोखण्यासाठी उमेदवारांची घोषणा न करता एबी फॉर्म देण्याची पद्धत राजकीय पक्षांनी स्वीकारली आहे. उद्धवसेनेकडून सोमवारी ५५ जणांना उमेदवारी अर्ज देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यात नेत्यांच्या मुलांचाही समावेश आहे.
मुंबई महापालिका निवडणूक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आणि राज ठाकरे यांच्या मनसेने एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही पक्षांचे जागावाटप झाले असले, तरी दोन्ही पक्षांनी जागांची घोषणा केलेली नाही. त्यानंतर आता थेट उमेदवारांना एबी फॉर्म देण्यास सुरुवात केली आहे. एबी फॉर्म देण्यात आलेल्या काही उमेदवारांची नावे सध्या चर्चेत आहेत. आतापर्यंत ५५ उमेदवारांना उद्धवसेनेकडून एबी फॉर्म दिला असल्याचे कळते.
एबी फॉर्म देण्यात आलेले उद्धवसेनेचे उमेदवार
१) प्रभाग क्रमांक १ – फोरम परमार
२) प्रभाग क्रमांक २ – धनश्री कोलगे
३) प्रभाग क्रमांक ३ – रोशनी गायकवाड
४) प्रभाग क्रमांक ५ – सुजाता पाटेकर
५) प्रभाग क्रमांक १६ – स्वाती बोरकर
६) प्रभाग क्रमांक २६ – धर्मेंद्र काळे
७) प्रभाग क्रमांक २९ – सचिन पाटील
८) प्रभाग क्रमांक ४० – सुहास वाडकर
९) प्रभाग क्रमांक ४९ – संगीता सुतार
१०) प्रभाग क्रमांक ५४ – अंकित प्रभू
११) प्रभाग क्रमांक ५७ – रोहन शिंदे
१२) प्रभाग क्रमांक ५९ – शैलेश फणसे
१३) प्रभाग क्रमांक ६० – मेघना विशाल काकडे माने
१४) प्रभाग क्रमांक ६१ – सेजल दयानंद सावंत
१५) प्रभाग क्रमांक ६२ – झीशान चंगेज मुलतानी
१६) प्रभाग क्रमांक ६३ – देवेंद्र (बाळा) आंबेरकर
१७) प्रभाग क्रमांक ६४ – सबा हारून खान
१८) प्रभाग क्रमांक ६५ – प्रसाद आयरे
१९) प्रभाग क्रमांक ८९ – गितेश राऊत
२०) प्रभाग क्रमांक ९३ – रोहिणी कांबळे
२१) प्रभाग क्रमांक ९५ – हरी शास्त्री
२२) प्रभाग क्रमांक १०० – साधना वरस्कर
२३) प्रभाग क्रमांक १०५ – अर्चना चौरे
२४) प्रभाग क्रमांक १११ – दीपक सावंत
२५) प्रभाग क्रमांक ११७ – श्वेता पावसकर
२६) प्रभाग क्रमांक ११८ – सुनीता जाधव
२७) प्रभाग क्रमांक १२० – विश्वास शिंदे
२८) प्रभाग क्रमांक १२३ – सुनील मोरे
२९) प्रभाग क्रमांक १२४ – सकीना शेख
३०) प्रभाग क्रमांक १२५ – सतीश पवार
३१) प्रभाग क्रमांक १२६ – शिल्पा भोसले
३२) प्रभाग क्रमांक १२७ – स्वरूपा पाटील
३३) प्रभाग क्रमांक १३० – आनंद कोठावदे
३४) प्रभाग क्रमांक १३२ – क्रांती मोहिते
३५) प्रभाग क्रमांक १३४ – सकीना बानू
३६) प्रभाग क्रमांक १३५ – समीक्षा सकरे
३७) प्रभाग क्रमांक १३७ – महादेव आंबेकर
३८) प्रभाग क्रमांक १३८ – अर्जुन शिंदे
३९) प्रभाग क्रमांक १४१ – विठ्ठल लोकरे
४०) प्रभाग क्रमांक १४२ – सुनंदा लोकरे
४१) प्रभाग क्रमांक १४८ – प्रमोद शिंदे
४२) प्रभाग क्रमांक १५० – सुप्रदा फातर्फेकर
४३) प्रभाग क्रमांक १५३ – मीनाक्षी पाटणकर
४४) प्रभाग क्रमांक १५५ – स्नेहल शिवकर
४५) प्रभाग क्रमांक १५६ – संजना संतोष कासले
४६) प्रभाग क्रमांक १६४ – साईनाथ साधू कटके
४७) प्रभाग क्रमांक १६७ – सुवर्णा मोरे
४८) प्रभाग क्रमांक १६८ – सुधीर खातू वार्ड
४९) प्रभाग क्रमांक २०६ – सचिन पडवळ
५०) प्रभाग क्रमांक २०८ – रमाकांत रहाटे
५१) प्रभाग क्रमांक २१० – सोनम जामसूतकर
५२) प्रभाग क्रमांक २१५ – किरण बालसराफ
५३) प्रभाग क्रमांक २१८ – गीता अहिरेकर
५४) प्रभाग क्रमांक २२२ – संपत ठाकूर
५५) प्रभाग क्रमांक २२५ – अजिंक्य धात्रक
Web Summary : Shiv Sena UBT, in alliance with MNS, prepares for BMC elections, issuing AB forms to 55 candidates, including leaders' kin, amidst a competitive political landscape.
Web Summary : शिवसेना यूबीटी, मनसे के साथ गठबंधन में, बीएमसी चुनावों की तैयारी कर रही है, नेताओं के रिश्तेदारों सहित 55 उम्मीदवारों को एबी फॉर्म जारी किए गए हैं।