Join us
Daily Top 2Weekly Top 5

BMC Election: "घरून काम करणाऱ्यांना आता घरातच बसावे लागेल" शिंदेसेनेचा उद्धव ठाकरेंना टोला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 10:50 IST

Shaina NC on Uddhav Thackeray: मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसाठी मतमोजणीला सुरुवात झाली असून, शिवसेना नेत्या शायना एनसी यांनी निकालापूर्वीच विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २२७ प्रभागांसाठी आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध पाहायला मिळत असून, शिवसेना नेत्या शायना एनसी यांनी निकालापूर्वीच विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना शायना एनसी म्हणाल्या की, "एक्झिट पोल हा केवळ एक ट्रेलर आहे, येत्या दोन तासांत संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत जनतेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील प्रगती आणि विकासकामांना पसंती दिली आहे. जमिनीवर उतरून काम करणाऱ्यांनाच जनता संधी देते." 

उद्धव ठाकरेंना टोला

यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता सडकून टीका केली. त्या म्हणाल्या की, उद्धव ठाकरेंनी पराभवासाठी दरवेळी नवीन कारणे शोधण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावे. जे लोकांमध्ये जाऊन काम करतात, त्यांना जनता निवडून देते. मात्र, जे घरातून काम करतात, त्यांना आता घरातच बसावे लागेल."

निकालाकडे सर्वांचे लक्ष

बीएमसीच्या २२७ जागांसाठी होत असलेल्या या मतमोजणीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात अटीतटीची लढत अपेक्षित आहे. सुरुवातीच्या कलानंतर मुंबईचा 'नवा राजा' कोण ठरणार, हे स्पष्ट होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यशैलीवर जनतेने किती विश्वास दाखवला आहे, हे या निकालातून सिद्ध होणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : BMC Election: Shinde Sena taunts Uddhav, 'Those working from home will stay home!'

Web Summary : Shaina NC expresses confidence in victory as BMC election counting begins. She indirectly criticized Uddhav Thackeray, stating those who work from home will stay home, while ground workers get opportunities.
टॅग्स :महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक निकाल २०२६उद्धव ठाकरेशिवसेना