मुंबई : निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होण्यास काही दिवस शिल्लक असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुर्ला, कालिना आणि चांदिवली या तीन विधानसभा मतदारसंघांचा केलेला दौरा शिंदेसेनेच्या उमेदवारांसाठी निर्णायक ठरला. अटीतटीच्या लढतीत शिंदेसेनेने महत्त्वाचे प्रभाग जिंकत ताकद दाखवली. तर, माजी मंत्री नवाब मलिक यांच्या कुटुंबाच्या जय-पराजयाची चर्चाही रंगली होती.
कुर्ला येथील प्रभाग क्रमांक १६६ मधून शिंदेसेनेच्या उमेदवार मीनल संजय तुर्डे, तर प्रभाग क्रमांक १६३ मधून शैला लांडे यांनी विजय मिळवला. या विजयामुळे कुर्ला परिसरात शिंदेसेनेची मजबूत पकड असल्याचे दिसून आले. चांदिवलीत प्रभाग क्रमांक १५६ मध्येही शिंदेसेनेच्या अश्विनी माटेकर यांची जादू कायम राहिली. कलिनातही शिंदेसेनेचे सगुण नाईक यांनीही प्रभाग क्रमांक ९१ मधून ८८३० मतांचा टप्पा गाठला. तर, प्रभाग १६९ मधील शिंदेसेनेचे उमेदवार आणि आ. मंगेश कुडाळकर यांचा मुलगा
कप्तान मलिक यांचा पराभव
प्रभाग क्रमांक १६५ मध्ये माजी मंत्री नवाब मलिक यांचे बंधू कप्तान मलिक यांचा पराभव झाला. मलिक यांच्या भगिनी डॉ. सईदा खान यांनी प्रभाग क्रमांक १६८ मध्ये विजय संपादन केला. कप्तान मलिक यांच्या सून बुशरा मलिक या प्रभाग क्रमांक १७० मधून ९ हजार २५२ मते मिळवित जिंकल्या आहेत.
काँग्रेसचा गड
प्रभाग क्रमांक ८९ मधून उद्धवसेनेचे गितेश विनायक राऊत यांनी विजय मिळवला. येथे उद्धवसेनेची जादू चालली. प्रभाग क्रमांक २० मधून काँग्रेसच्या तुलीप मिरांडा विजयी झाल्या. हा मतदारसंघ पारंपरिकरित्या काँग्रेसचा गड असल्याने त्यांचा विजय अपेक्षित मानला जात होता.
७ मतांनी विजय
कलिना येथील प्रभाग २० मध्ये काँग्रेसच्या तुलिप मिरांडा अवघ्या ७ मतांनी विजयी झाल्या. त्यांना ५ हजार १९७ मते मिळाली. येथे भाजपच्या ज्योती उपाध्याय यांना ५ हजार १२० मते मिळाली.
Web Summary : Eknath Shinde's rallies boosted Shiv Sena's performance in Kurla, Kalina, and Chandivali, securing key wins. Nawab Malik's brother lost, but his sister and daughter-in-law won. Congress retained its stronghold, narrowly winning by 7 votes.
Web Summary : एकनाथ शिंदे की रैलियों से शिवसेना का प्रदर्शन कुर्ला, कलिना और चांदीवली में बेहतर रहा, महत्वपूर्ण जीत हासिल हुई। नवाब मलिक के भाई हार गए, लेकिन उनकी बहन और बहू जीतीं। कांग्रेस ने अपना गढ़ बरकरार रखा, 7 वोटों से जीत हासिल की।