BMC Election Results 2026: वडाळ्यात यादीत नाव एकाचे, फोटो मात्र दुसऱ्याचाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 09:34 IST2026-01-16T09:34:21+5:302026-01-16T09:34:21+5:30

यादीत नाव एकाचे आणि फोटो दुसऱ्याचा अशी स्थिती

BMC Election Results 2026 Chaos in Wadala Senior Citizens Left Frustrated After Photo Mismatches and Missing Names in Voter List | BMC Election Results 2026: वडाळ्यात यादीत नाव एकाचे, फोटो मात्र दुसऱ्याचाच

BMC Election Results 2026: वडाळ्यात यादीत नाव एकाचे, फोटो मात्र दुसऱ्याचाच

मुंबई : वडाळा येथील ज्येष्ठ नागरिक प्रकाश बोरगावकर आणि त्यांचे सहकारी उत्साहाने गुरुवारी सकाळीच वडाळा येथील मतदान केंद्रावरदाखल झाले. तेथील यादीत नाव एकाचे आणि फोटो दुसऱ्याचा अशी स्थिती होती. त्यामुळे सर्वांना त्यांचे नाव सापडले नाही.

बोरगावकर व त्यांच्या सहकाऱ्यांना दरम्यानच्या काळात त्यांचे नाव दुसऱ्या केंद्रात असल्याची माहिती दिल्यानंतर त्यांनी तेथे जाऊन मतदानाचा हक्क बजावला. मात्र, या साऱ्यात त्यांना मनस्ताप झाला. बोरगाव आणि त्यांच्या सहकाऱ्यांची केंद्रावरील यादीत नावे नसली तरी अॅपवर व्यवस्थित माहिती मिळत होती.

अखेर दुसऱ्या केंद्रामध्ये सापडले नाव मतदारयादीमध्ये पाऊण तास नाव शोधूनही ते सापडत नव्हते. अशी परिस्थिती असेल तर मतदान होणार कसे, असा सवाल करत बोरगावकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याच वेळी त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांची नावे दुसऱ्या मतदान केंद्रातील यादीत आहेत. मतदान केंद्रातही बदल झाला आहे, अशी माहिती देण्यात आली. त्यानुसार त्यांनी नवीन केंद्रावर दाखल होत मतदान केले. मतदानासाठी चांगली व्यवस्था केली आहे, असे गेल्या कित्येक दिवसांपासून प्रशासनाकडून सांगितले जात होते. मात्र, आम्हाला आलेले अनुभव अत्यंत वाईट होता, अशी प्रतिक्रिया या ज्येष्ठ नागरिकांनी दिली.
 

Web Title : बीएमसी चुनाव में गड़बड़ी: वडाला में मतदाता नाम में गड़बड़ी से निराशा

Web Summary : वडाला में मतदाता सूची में नाम और फोटो की विसंगतियों के कारण मतदाता को परेशानी हुई। ऐप की सटीकता के बावजूद, उसका नाम ढूंढने में समय लगा, जिससे लॉजिस्टिक मुद्दे सामने आए। अच्छी व्यवस्था के दावों के बावजूद उन्होंने मतदान प्रक्रिया पर कड़ी नाराजगी जताई।

Web Title : BMC Election Blunder: Voter's Name Mismatch Causes Frustration in Wadala

Web Summary : Wadala voter faced distress due to name and photo discrepancies in voter lists. Despite app accuracy, locating his name took time, revealing logistical issues. He expressed strong dissatisfaction with the voting process despite claims of good arrangements.