Join us
Daily Top 2Weekly Top 5

BMC Election Results 2026: जगाला हेवा वाटेल अशी मुंबई घडवण्याचा प्रयत्न: एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 06:26 IST

जनतेने विकासाला स्वीकारले असून विकासाला विरोध करणाऱ्यांना नाकारले

मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकीत महायुतीच्या बाजूने वातावरण राहिले असून विकासाच्या अजेंड्यावर आम्ही निवडणूक लढवली. मुंबईत महायुतीचा महापौर बनणार असून जगाला हेवा वाटेल अशी मुंबई घडवण्याचा आमचा प्रयत्न असेल, अशी प्रतिक्रिया महापालिका निवडणुक निकालावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. 

ठाकरे बंधूंना टोला लगावताना शिंदे म्हणाले की, काही पक्षांनी निवडणूक भावनेच्या आधारावर लढवली असली तरी जनतेने महायुतीलाच कौल दिला. मुंबईकर, ठाणेकर तसेच राज्यातील सर्व मतदारांचे त्यांनी आभार मानले. ठाणेकरांनी शिवसेनेला स्पष्ट बहुमत दिल्याबद्दल त्यांनी विशेष कृतज्ञता व्यक्त केली.

जनतेने विकासाला स्वीकारले असून विकासाला विरोध करणाऱ्यांना नाकारले

गेल्या साडेतीन वर्षांत मुंबईकरांसाठी आम्ही मोठ्या प्रमाणात काम केले आहे. मुंबई महापालिकेत २५ वर्ष सत्तेत असलेल्या लोकांच्या कारभाराविरोधात मतदारांनी मतदान केले आहे. जनतेने विकासाला स्वीकारले असून विकासाला विरोध करणाऱ्यांना नाकारले, असा ठाम दावा त्यांनी केला. खड्डेमुक्त, प्रदूषणमुक्त, वाहतूक कोंडीमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त मुंबई घडवण्याचे काम आधीच सुरू केले असून मुंबईकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी महायुती कटिबद्ध आहे, असे शिंदे म्हणाले.

... तिथे स्थानिक परिस्थितीवर निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई जागतिक दर्जाचे शहर व्हावे, असा सातत्याने उल्लेख केला असून जगाला हेवा वाटेल अशी मुंबई घडवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. इतर महापालिकांमध्ये जिथे वेगवेगळ्या पक्षांनी स्वतंत्रपणे लढत दिली आहे, तिथे स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

English
हिंदी सारांश
Web Title : BMC Election 2026: Shinde vows to build a world-class Mumbai.

Web Summary : Eknath Shinde aims for a grand Mumbai, rivaling global cities, after the BMC elections. He criticized opponents for emotional appeals, thanking voters for backing the Mahayuti alliance and development. He promised a corruption-free, better Mumbai, fulfilling expectations.
टॅग्स :महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक निकाल २०२६एकनाथ शिंदे