BMC Election Result 2026 : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांमध्ये आज दक्षिण मध्य मुंबईतील प्रभाग क्रमांक १९४ मध्ये शिंदेसेनेला मोठा धक्का बसला आहे. सदा सरवणकर यांना विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर आता त्यांच्या पुत्रालाही महापालिका निवडणुकीत हादरा बसला आहे. ठाकरेंचे विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे यांचे बंधू निशिकांत शिंदे यांनी समाधान सरवणकर यांना पराभूत केलं. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या लढतीत निशिकांत शिंदे यांनी सदा सरवणकर यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. मुंबई महानगरपालिका निकालाचे सर्व अपडेट्स इथे पहा Live.
अटीतटीची लढत आणि सत्तापालट
प्रभाग १९४ हा शिवसेनेचा (शिंदे गट) बालेकिल्ला मानला जात होता. समाधान सरवणकर यांना पराभूत करणे हे निशिकांत शिंदे यांच्यासमोर मोठे आव्हान होते. सुरुवातीच्या फेऱ्यांपासूनच शिंदे यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली होती. शेवटच्या फेरीपर्यंत ही चुरस कायम होती, मात्र अखेर मतदारांनी निशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत त्यांना विजयाची माळ घातली.
"ज्याचा उदय प्रभादेवीमध्ये झाला त्याचा अस्त देखील प्रभादेवीत व्हायला हवा. मतदारांचा मी ऋणी आहे. सरवणकर कुटुंबांने बाळासाहेबांना आणि उद्धव ठाकरेंना त्रास दिला. त्यांना गाडण्याचे काम सर्व मतदारांनी केले. त्यांनी आमच्यावर आरोप केले पण आमच्याकडे सत्ता नव्हती. गेली वर्षभर मी प्रश्न सोडवत आहे," अशी प्रतिक्रिया स्थानिक आमदार महेश सावंत यांनी दिली.
Web Summary : In Mumbai's BMC Election 2026, Shinde Sena faced a blow in Ward 194. Nishikant Shinde defeated Samadhan Sarvankar, son of Sada Sarvankar, in a closely contested battle. The ward was considered a Shinde faction stronghold.
Web Summary : मुंबई बीएमसी चुनाव 2026 में वार्ड 194 में शिंदे सेना को झटका लगा। निशिकांत शिंदे ने सदा सरवणकर के बेटे समाधान सरवणकर को करीबी मुकाबले में हराया। यह वार्ड शिंदे गुट का गढ़ माना जाता था।