तीन निवडणुकांच्या तुलनेत यंदा उमेदवार घटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 10:43 IST2026-01-10T10:43:17+5:302026-01-10T10:43:17+5:30
याचा थेट परिणाम राजकारण व निकालांवर होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

तीन निवडणुकांच्या तुलनेत यंदा उमेदवार घटले
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गेल्या तीन मुंबई महापालिका निवडणुकांच्या तुलनेत यंदा उमेदवारांची संख्या लक्षणरियरीत्या घटल्याचे समोर आले आहे. याचा थेट परिणाम राजकारण व निकालांवर होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
२००७, २०१२ आणि २०१७ या तीनही महापालिका निवडणुकांमध्ये पक्षीय लढतीसोबतच अपक्ष उमेदवारांची मोठी गर्दी दिसून आली होती. यंदा ही परिस्थिती बदलल्याचे चित्र आहे.
उमेदवारांची संख्या घटण्यामागे निवडणूक खर्चात झालेली मोठी वाढ हे महत्त्वाचे कारण मानले जात आहे. प्रचार साहित्य, डिजिटल प्रचार, वाहनांची व्यवस्था, मनुष्यबळ यासाठी लागणारा खर्च सर्वसामान्य उमेदवारांच्या गेल्याने आवाक्याबाहेर अनेकांनी निवडणूक लढवण्याचा विचारच सोडून दिल्याचे सांगितले जात आहे.
तसेच प्रचारावर असलेले कडक निर्बंध, मुद्रक-प्रकाशकाची माहिती देण्याची सक्ती, खर्च मर्यादा आणि कायदेशीर तपासणी हेही एक कारण असल्याचे बोलले जात आहे. निवडणूक खर्चात वाढ झाल्याने अनेक इच्छुकांनी एक पाऊल मागे घेतले आहे.
'मोठ्या पक्षांना फायदा'
राजकीय विश्लेषकांच्या मते, उमेदवारांची संख्या कमी झाल्याने मतांचे विभाजन तुलनेने कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत थेट लढती अधिक स्पष्ट होतील. याचा फायदा मोठ्या आणि संघटित पक्षांना होण्याची शक्यता आहे.
गेल्या निवडणुकांत अपक्षांमुळे २ अडचणीत आलेल्या अनेक प्रभागांत यंदा स्पष्ट कौल मिळण्याची शक्यता आहे. उमेदवार कमी असले तरी निवडणूक चुरशीची ठरेल. मर्यादित उमेदवारांमुळे प्रचार अधिक आक्रमक, मुद्देसूद आणि थेट मतदारांपर्यंत पोहोचणारा होण्याची शक्यता आहे.