लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: मुंबई महापालिकेच्या आगामी महापौर आणि उपमहापौर पदासाठी येत्या ११ फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीत उतरण्याचे संकेत उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. पालिका गटनेत्या किशोरी पेडणेकर यांच्यासह काही अनुभवी नगरसेवकांची त्यांनी मातोश्रीवर बैठक घेतली, तर निवडणूक काळात पक्षाच्या नगरसेवकांनी मुंबई सोडू नये, असे आदेशही त्यांनी दिले आहेत.
मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल लागून पंधरा दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे. यंदाचे महापौरपद महिलेसाठी आरक्षित झाल्याने महापौर कोण होणार याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. या पदासह उपमहापौर पदासाठीही शनिवारी (दि.७ फेब्रुवारी) अर्ज दाखल केले जाणार आहेत. भाजप आणि शिंदेसेनेचे संख्याबळ जास्त असल्याने या दोन्ही पदांवर त्यांचेच उमेदवार निवडून येण्याची शक्यता अधिक आहे. मात्र, ही निवडणूक बिनविरोध होऊ न देण्याचा निर्णय उद्धवसेनेने घेतला आहे.
"पालिका निवडणूक झाली आहे. त्यामुळे आता महत्त्वाच्या विषयावर फोकस करणे गरजेचे आहे. महापौर पदासाठी आम्ही उमेदवार देणार की नाही त्याबद्दल आता बोलणार नाही, हे लवकरच समजेल. आमच्या पक्षाची लोक कामाला लागली आहेत", असे म्हणत उद्धवसेनेचे आ. आदित्य ठाकरे यांनी सस्पेन्स वाढविला आहे.
मुंबईचे अस्तित्व व अस्मिता संपविण्याची कामगिरी भाजपने केली. मुंबई भविष्यात उद्योगपतींच्या हातात दिली जाईल. मुंबई स्वतंत्र करावी अशीच भाजपची कायम भूमिका आहे. अशावेळी महाराष्ट्राच्या राजधानीवर एकनाथ शिंदे यांच्या मदतीने भाजपचा महापौर येणे हा महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी दुःखाचा दिवस असेल. संजय राऊत, खासदार उद्धवसेना
उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मातोश्री येथे अनुभवी नगरसेवकांसोबत चर्चा केली. संख्याबळ नसले तरी महापौर, उपमहापौर पदांसाठी अर्ज भरण्याबाबतचा विचारविनिमय यावेळी करण्यात आला. दरम्यान, महापौर निवडणुकीत उमेदवार देण्याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. किशोरी पेडणेकर, गटनेत्या उद्धवसेना
Web Summary : Uddhav Thackeray signals entering Mumbai's mayoral election. He instructed corporators to remain in Mumbai during the election. Despite BJP/Shinde coalition's strength, Shiv Sena (UBT) aims to contest, preventing unopposed election. Focus remains on Mumbai's identity amid political shifts.
Web Summary : उद्धव ठाकरे ने मुंबई महापौर चुनाव में उतरने का संकेत दिया। उन्होंने पार्षदों को चुनाव के दौरान मुंबई में रहने का आदेश दिया। भाजपा/शिंदे गठबंधन की ताकत के बावजूद, शिवसेना (यूबीटी) चुनाव लड़ने का लक्ष्य रखती है, ताकि निर्विरोध चुनाव न हो। राजनीतिक बदलावों के बीच मुंबई की पहचान पर ध्यान केंद्रित है।