मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर माजी आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांनी भाजपाचं स्थानिक नेतृत्व आणि कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप केले होते. तसेच या संदर्भातील काही व्हॉट्सअॅप चॅटही दाखवत भाजपाच्या कार्यकर्त्यांना सरवणकरांचं काम करू नका अशा सूचना देण्यात आल्या होत्या, असा आरोपही सरवणकर यांनी केला होता. मात्र आता समाधान सरवणकर यांनी आपली तलवार म्यान केली असून, भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या सूचनेनुसार सदर विषय येथेच थांबवण्यात येत आहे, असे त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून स्पष्ट केले आहे.
समाधान सरवणकर यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून, त्यात त्यांनी लिहिले की, माहीम विधानसभा क्षेत्रातील मुंबई महानगरपालिका निवडणुकीदरम्यान भारतीय जनता पक्ष आणि संबंधित परिवाराने अत्यंत उल्लेखनीय व प्रशंसनीय कार्य केले असून, पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी संघटितपणे, निष्ठेने आणि शिस्तबद्ध रीतीने उत्तम सहकार्य केले, हे निर्विवाद आहे. परंतु एका विशिष्ट व्यक्तीच्या जाणीवपूर्वक कृतीमुळे महायुतीला नुकसान झाले असून, त्याच व्यक्तीमार्फत इतर कार्यकर्त्यांपर्यंत चुकीची माहिती पोहोचवण्यात आल्याची बाब निदर्शनास आली आहे. मात्र आता मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या सूचनेनुसार सदर विषय येथेच थांबवण्यात येत आहे. आगामी काळात संबंधित सर्व बाबी योग्य त्या पातळीवर तसेच महायुती समन्वयक समितीसमोर सविस्तरपणे मांडण्यात येतील, असे देखील साटम यांनी आश्वस्त केले आहे, असेही सरवणकर यांनी सांगितले.
सरवणकर यांच्या आरोपांबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष अमित साटम म्हणाले होते की, "समाधान सरवणकर फार कमी मतांनी पराभूत झाले आहेत. त्यांनी काही विषयांवर चिंता व्यक्त केली आहे. त्याबाबत काय सत्यता आहे हे तपासून पाहू. त्यांच्याकडून आणि इतर व्यक्तींकडूनही याबाबत माहिती घेऊ. त्याचा विचार करुन आम्ही निर्णय घेऊ. त्यांनी भाजपवर कुठलाही आक्षेप नोंदवलेला नाही. त्यांनी काही लोकांवर आक्षेप घेतला आहे. अशा गोष्टींची एकमेकांसोबत चर्चा केल्याने त्या चांगल्या पद्धतीने सुटू शकतात. माध्यमांसमोर या गोष्टी बोलणं टाळलं पाहिजे," असं अमित साटम म्हणाले.
दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदेसेनेला अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती. तसेच शिंदेसेनेतील अनेक बलाढ्य उमेदवारांना पराभवाचा धक्का बसला होता. सर्वांचं लक्ष असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १९४ मध्ये माजी नगरसेवक समाधान सरवणकर हे पराभूत झाले होते. त्यानंतर सरवणकर यांनी भाजपाकडून सहकार्य न मिळाल्याने पराभव झाल्याचा आरोप केला होता.
Web Summary : Samadhan Sarvankar, after alleging non-cooperation from BJP, has retracted his statements following Amit Satam's guidance. Sarvankar stated that issues would be addressed with the Mahayuti coordination committee. Satam confirmed reviewing Sarvankar's concerns regarding the Mumbai municipal elections where many candidates faced defeat.
Web Summary : भाजपा पर असहयोग का आरोप लगाने के बाद, समाधान सरवणकर ने अमित साटम के मार्गदर्शन के बाद अपने बयान वापस ले लिए। सरवणकर ने कहा कि महायुति समन्वय समिति के साथ मुद्दों का समाधान किया जाएगा। साटम ने मुंबई नगर निगम चुनावों के संबंध में सरवणकर की चिंताओं की समीक्षा करने की पुष्टि की, जहाँ कई उम्मीदवारों को हार का सामना करना पड़ा।