उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या बंधूनी परस्परांमधील मतभेद मिटवून मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी युती करण्याचा निर्णय घेतल्याने मुंबईतील राजकीय समीकरणं बदलली आहेत. मात्र उद्धवसेना आणि मनसेच्या उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर काही ठिकाणी नाराजी उफाळून आली आहे. त्यात मुंबईतील मराठीबहूल भागांपैकी एक असलेल्या भांडुपमध्ये मनसेत नाराजीचा स्फोट झाला आहे. येथील प्रभाग क्रमांक ११४ उद्धवसेनेला सुटल्याने मनसेकडून इच्छूक असलेल्या माजी नगरसेविका अनिशा माजगावकर या नाराज झाल्या असून, त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
अनिशा माजगाावकर ह्या २०१२ साली प्रभाग क्रमांक ११४ मधून मनसेच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. तर २०१७ साली शिवसेनेच्या रमेश कोरगावकर यांनी त्यांचा पराभव केला होता. दरम्यान, यावेळी प्रभाग क्रमांक ११४ मधून निवडणूक लढवण्यास त्या इच्छूक होत्या. तसेच उद्धवसेनेचे रमेश कोरगावकर हे येथून पत्नीला उमेदवारी मिळावी यासाठी इच्छूक होते. दरम्यान, हा प्रभाग जागावाटपामध्ये उद्धवसेनेला सुटल्यानंतर उद्धवसेनेकडून येथे खासदार संजय दिना पाटील यांच्या कन्या राजोल पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली.
दरम्यान, प्रभाग क्रमांक ११४ मधून उमेदवारी हुकल्यानंतर अनिशा माजगावकर यांनी नाराजी व्यक्त करत बंडाचा पवित्रा घेतला होता. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी राज ठाकरे यांनी त्यांनी शिवतीर्थावर बोलावले होते. मात्र तरीही त्यांची नाराजी दूर होऊ शकली नाही. अखेरीस अनिशा माजगावकर यांनी प्रभाग क्रमांक ११४ मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
Web Summary : Following the Sena-MNS alliance for Mumbai elections, Anisha Majgaonkar, a former MNS corporator, felt slighted after being denied a ticket and has filed as an independent candidate from Ward 114 despite efforts to appease her.
Web Summary : मुंबई चुनाव के लिए शिवसेना-मनसे गठबंधन के बाद, पूर्व मनसे पार्षद अनीशा माजगांवकर को टिकट से वंचित किए जाने पर नाराजगी हुई और उन्होंने मनाने के प्रयासों के बावजूद वार्ड 114 से निर्दलीय उम्मीदवार के रूप में नामांकन दाखिल किया।