Join us
Daily Top 2Weekly Top 5

मनसेच्या मुंबईतील उमेदवारांना राज ठाकरेंचा मोलाचा सल्ला, म्हणाले, ‘तुम्हाला ऑफर येतील, पण…’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 13:48 IST

Mumbai Municipal Corporation Election: मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष हा ५३ जागांवर निवडणूक लढवत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आटोपल्यानंतर मनसेच्या या उमेदवारांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी या उमेदवारांना मार्गदर्शन करताना महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष हा ५३ जागांवर निवडणूक लढवत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आटोपल्यानंतर मनसेच्या या उमेदवारांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी या उमेदवारांना मार्गदर्शन करताना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. आता तुम्हाला अनेक ऑफर येतील, मात्र कुठल्याही आमिषाला बळी पडू नका, असा सल्ला राज ठाकरे यांनी दिला आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मनसेकडून लढत असलेल्या ५३ उमेदवारांनी आज शिवतीर्थ येथे जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी या उमेदवारांना आवाहन करताना राज ठाकरे यांनी सांगितले की, आता तुम्हाला अनेक ऑफर येतील, मात्र कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. कुणी पैसे दिले तरी, त्या मोहाला बळी जाऊ नका. आपल्याला मुंबई वाचवायची आहे. मुंबई ही मराठी माणसाची आहे आणि मुंबई वाचवायची ही आपल्याकडे असलेली शेवटची संधी आहे, असं कळकळीचं आवाहन राज ठाकरे यांनी केलं.

दरम्यान, २०१७ साली झालेल्या मुंबई महानगपालिकेच्या निवडणुकीत ७ जागा जिंकणाऱ्या मनसेने यावेळी उद्धवसेनेसोबत युती केली आहे. तसेच उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू एकत्र आल्याने शिवसैनिकांचा उत्साह द्विगुणित झालेला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धवसेना सुमारे १६५ त ५३ जागांवर लढत आहेत.      

English
हिंदी सारांश
Web Title : Raj Thackeray advises MNS candidates in Mumbai to resist offers.

Web Summary : Raj Thackeray urged MNS candidates contesting Mumbai's municipal elections to resist temptations of offers. He emphasized preserving Mumbai for Marathi speakers.
टॅग्स :महानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महानगरपालिकामुंबई महापालिका निवडणूक २०२६मनसेराज ठाकरे