Join us
Daily Top 2Weekly Top 5

मनसेच्या बंडखोर उमेदवार राज ठाकरेंना म्हणाल्या, साहेब धन्यवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 11:18 IST

पूर्व उपनगरात मनसेप्रमुख राज ठाकरे यांची शाखा भेट भांडुपच्या प्रभाग क्रमांक ११४ मध्ये लक्षणीय ठरली.

मुंबई: पूर्व उपनगरात मनसेप्रमुख राज ठाकरे यांची शाखा भेट भांडुपच्या प्रभाग क्रमांक ११४ मध्ये लक्षणीय ठरली. या प्रभागात उद्धवसेनेचे खा. संजय पाटील यांची कन्या राजुल आणि मनसेच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष व बंडखोर उमेदवार अनिशा माजगावकर रिंगणात आहेत. 

राजुल यांच्या प्रचारासाठी राज  यांचा ताफा जात असताना त्यांचे वाहन माजगावकर उभ्या असलेल्या ठिकाणी थांबला. घेण्यासाठी पुढे गेले, तेव्हा राज यांनी काच खाली करून त्यांना हात दाखवला. त्यावर माजगावकर म्हणाल्या, ‘साहेब, धन्यवाद!’ प्रभाग क्रमांक ११४ मध्ये पाटील, माजगावकर आणि शिंदेसेनेकडून सुप्रिया धुरत रिंगणात आहे. माजगावकर यांच्या बंडखोरीने राजकारण तापले आहे. त्यांच्यावर मनसेकडून कारवाई झालेली नसल्याने पाटील नाराज असल्याची  चर्चा आहे. दुसरीकडे अमित ठाकरे यांच्या शाखा भेटीनंतर राज यांनी राजुल यांच्या कार्यालयाला भेट देत शुभेच्छा दिल्या.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Rebel MNS Candidate Thanks Raj Thackeray Amidst Political Tensions

Web Summary : MNS rebel Anisha Majgaonkar thanked Raj Thackeray during his visit to Bhandup. This occurred amidst a heated election battle involving Shiv Sena's Rajul Patil and Shinde's Supriya Dhurat. Majgaonkar's rebellion has stirred political tensions, with Patil reportedly unhappy about the lack of action from MNS.
टॅग्स :महानगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक २०२६मनसे